Electrol Bond : इलेक्टोरल बाँड घोटाळ्याच्या SIT तपासाची गरज नाही, SCने याचिका फेटाळली

No need for SIT probe into electoral bond scam SC dismisses plea

कॉमन कॉज’ आणि ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ (CPIL) या स्वयंसेवी संस्थांनी दाखल केली होती याचिका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना कॉर्पोरेट कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या राजकीय देणग्यांबाबत ‘विशेष तपास पथक’ (एसआयटी) चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (2 ऑगस्ट) फेटाळली. (Electrol Bond)

या कथित घोटाळ्याची सध्या चौकशी करण्याची गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ज्या प्रकरणांमध्ये कोणाला शंका असेल, तो कायदेशीर मार्ग स्वीकारू शकतो. त्यावर तोडगा न निघाल्यास तो न्यायालयात जाऊ शकतो.

वास्तविक, ‘कॉमन कॉज’ आणि ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ (CPIL) या स्वयंसेवी संस्थांच्या याचिकेत कथित लाच राजकीय देणग्यांद्वारे देण्यात आल्याचे म्हटले होते की, ‘इलेक्ट्रॉन बाँडद्वारे दिलेल्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. सीबीआय किंवा इतर कोणतीही तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत नाही. अशा परिस्थितीत न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी तपास व्हावा, अशी आमची मागणी आहे.’

No need for SIT probe into electoral bond scam SC dismisses plea

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात