आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणात बदल नाही; अजित डोवाल, पी. के. मिश्रा हेच पंतप्रधानांचे सल्लागार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कारकिर्दीत भाजपला जरी स्वबळावर बहुमत नसले, तरी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणात कुठलाही बदल होणार नाही, याची निश्चिती करणाऱ्या नियुक्त्या पंतप्रधान मोदींनी केल्या. अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी आणि पी. के. मिश्रा यांची पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी पदी नियुक्ती केली. डोवाल आणि मिश्रा हे दोन अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे सूत्रधार आहेत.No change in aggressive foreign and defense policy; Ajit Doval, P. K. Mishra is the Prime Minister’s advisor!!



मोदी आपल्या तिसऱ्या काळात कार्यकाळात आपल्या सहकारी मंत्र्यांमध्ये आणि सल्लागारांमध्ये बदल करतील, अशा अटकळी काही प्रसार माध्यमांनी बांधल्या होत्या. त्या प्रत्यक्षात खोट्या ठरल्या. मोदींनी गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बदल केले नाहीत. त्या पाठोपाठ त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांच्यामध्ये देखील बदल केले नाहीत. त्यामुळे भारताच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणात काही बदल होणार नाही, असा स्पष्ट संदेश भारतासह सर्व जगभर गेला.

अजित डोवाल आत्तापर्यंत पंतप्रधानांनी दिलेल्या वेगवेगळ्या असाइनमेंट वर यशस्वी ठरलेले अधिकारी आहेत. यामध्ये पाकिस्तान वरचा पहिला सर्जिकल स्ट्राइक आणि नंतरचा एअर स्ट्राइक यांचा समावेश आहेच. परंतु, डोवाल यांनी अरब देश, चीन तसेच अमेरिका जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत क्वाड देश यांच्यातल्या वेगवेगळ्या असाइनमेंट यशस्वी केल्या. त्यामुळे गेल्या 10 वर्षांमध्ये भारताची “कबूतर उडवी” प्रतिमा बदलून एक आक्रमक देश म्हणून प्रतिमा तयार झाली.

पी. के. मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले. पंतप्रधानांच्या कार्यालयातील सगळी सूत्रे त्यांनी नेहमीच सुसूत्रपणे हलविली. कुठेही कुठल्याही माहितीची गळती झाली होऊ दिले नाही. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय जगातल्या सरकार प्रमुखाचे सर्वांत मोठे आणि शक्तिशाली कार्यालय म्हणून प्रस्थापित झाले. मोदींच्या आक्रमक प्रतिमा निर्मितीमध्ये पंतप्रधान कार्यालयाने फार महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये पी. के. मिश्रा यांचा सिंहाचा वाटा राहिला.

No change in aggressive foreign and defense policy; Ajit Doval, P. K. Mishra is the Prime Minister’s advisor!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात