विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एका मुलाखतीदरम्यान, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि देशातील हिंदू-मुस्लिम राजकारणाविषयी मत मांडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य केलं. नसीर म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पहिले व्यक्ती नाहीत ज्यांनी मुस्लिम लोकांविरोधात काही बोलले आहे. असे राजकारण यापूर्वीही झाले आहे. छोट्या-छोट्या गोष्टींचा मुद्दा बनवून चुकीच्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या मुस्लिम लोकांनाही त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी हे केले नसते तर मुस्लिमांची दिशाभूल कोणीच करू शकले नसते.
I hope he’s not joining the BJP. Why is he suddenly talking sense? pic.twitter.com/hPt6fnrss7 — Kartikeya Tanna (@KartikeyaTanna) June 11, 2024
I hope he’s not joining the BJP. Why is he suddenly talking sense? pic.twitter.com/hPt6fnrss7
— Kartikeya Tanna (@KartikeyaTanna) June 11, 2024
‘द वायर’शी बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. नसीरुद्दीन शाह यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे आणि योग्य मार्गाने याचे निराकरण करण्याबद्दल बोलले पाहिजे. ते म्हणतात की कोणत्याही गोष्टीला विरोध करणे खूप सोपे आहे, परंतु कोणत्याही गोष्टीचे समर्थन करणे तितकेच कठीण आहे. रिपोर्टनुसार नसीरुद्दीन शाह म्हणाले- देशात जे काही घडत आहे, त्यासाठी नरेंद्र मोदींना दोष देणे खूप सोपे आहे. पण हे खरे आहे का? नाही! कारण मोदी सत्तेवर येण्यापूर्वीच देशात खूप काही चुकीचे झाले होते. मोदींनी त्या चुकीच्या गोष्टींना पुन्हा हात घातला आणि दडपल्या गेलेल्या गोष्टींना हवा दिली.
इतरांच्या धर्माची खिल्ली उडवायचे
नसीरुद्दीन शाह इथेच थांबत नाहीत, तर ते म्हणतात की, मुस्लिम असल्याचा टोमणा मारला गेला. त्याला ते क्षण आठवले जेव्हा लोक त्यांच्या धर्मामुळे त्यांच्याबद्दल खूप अपमानास्पद बोलत होते. पुढे त्यांचे बालपणीचे दिवस आठवत ते म्हणाले – मला आठवते माझ्या लहानपणी मला मुस्लिम म्हणून टोमणे मारले जायचे आणि मी इतरांना त्यांच्या धर्माबद्दल चिडवायचो. या सर्व गोष्टी समाजात आधीच होत्या. नसीरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदींना अतिशय हुशार व्यक्ती म्हटले आणि त्यांनी अनेक गोष्टी जाणूनबुजून छेडल्याचं सांगितलं.
मुस्लिमांच्या चुका सांगितल्या
नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले की मुस्लिमांनी कुठे चूक केली आणि इतरांनी त्याचा फायदा घेतला. ते म्हणाले- सत्य हे आहे की मुसलमानही पाक-साफ नाहीत. मुस्लिमांनी नेहमीच चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. जेव्हा त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांच्या समुदायाचे ज्ञान वाढवावे तेव्हा ते हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीवर लक्ष केंद्रित करत होते. जेव्हा आधुनिक गोष्टी शिकवायच्या होत्या तेव्हा त्या मदरशांमध्ये ढकलण्यावर भर दिला जात होता. हा सर्व दोष मुस्लिमांचा आहे. त्यांनी मुस्लिम जनतेला पुन्हा एकदा उठून या विषयावर बोलण्याचे आवाहन केले.
मोदी केवळ परंपरा पाळत आहेत
नसीर यांच्या दृष्टीने मुस्लिमांना विरोध करणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते नाहीत. मुस्लिमविरोधी टिप्पण्यांवर ते म्हणाले की असे करणारे ते (मोदी) पहिले नेते नाहीत. होय पण ते योग्य वेळी दाखल झाले आहेत. मुस्लिम लीगला प्रतिसाद म्हणून 1915 मध्येच हिंदू महासभेची स्थापना झाली. मला दोन बंगाली लोकांची नावे आठवत नाहीत पण त्यांनी दोन राष्ट्र सिद्धांताची चर्चा सुरू केली. स्वातंत्र्याचा लढा शेवटच्या टप्प्यात असताना या गोष्टी घडल्या. त्या काळात हिंदू आणि मुस्लिम पूर्णपणे एकत्र होते. नसीर म्हणतात की मोदी ही परंपरा पाळत आहेत जी अनेक नेत्यांनी फार पूर्वी पाळली होती आणि आता अनेक नेते मिळून ही परंपरा पुढे चालवत आहेत. या यादीत योगी आदित्यनाथदेखील आहेत जे आजही म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत.
आठवली जुनी टोपीची घटना
नसीर म्हणाले की, जेव्हा काही मौलवींनी मोदींना एका कार्यक्रमात टोपी दिली तेव्हा त्यांनी ती घालण्यास नकार दिला. ही आठवण विसरणे कठीण आहे. मोदींनी हे केले असते, तर आम्ही वेगळे नाही, असा संदेश गेला असता, ते मुस्लिमांना पटवून देऊ शकले तर ते खूप उपयुक्त ठरेल. टोपी घालणे हा एक संदेश असेल की मुस्लिमदेखील या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांना खात्री मिळेल की ते त्यांचा द्वेष करत नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App