विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी येत्या 4 – 6 महिन्यांमध्ये राज्य सरकार बदलण्याचा एल्गार पुकारला, पण त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि नातू रोहित पवारांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त डबल डिजिट म्हणजे 85 आमदारच निवडून आणण्याचा निर्धार केला. Sharad pawar wants to change the government in maharashtra, but rohit pawar sets target of 85 mlas for NCP
श्रीरामपूर मध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेल्या तिसऱ्या सरकारचे वर्णन पहिल्या दोन सरकारांपेक्षा वेगळे असल्याचे केले. मोदींनी शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी काम केले नाही. त्यांनी अल्पसंख्यांकांच्या विरोधात धर्मभावना भडकावल्या त्यामुळे आता इथून पुढे मोदींची गॅरंटी चालणार नाही, असा दावाही पवारांनी केला.
त्याचवेळी शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले सरकार येत्या 4 – 6 महिन्यांमध्ये बदलण्याचा एल्गार पुकारला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथले सरकार बदलावे लागेल. ते आपण 4 – 6 महिन्यांत बदलून टाकू, असे पवार म्हणाले. पण त्यावेळी त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किती आमदार निवडून येतील??, याचा आकडा मात्र सांगितला नाही.
पण राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यात रोहित पवारांनी नगर मधल्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीचे आमदारांचा आकडा सांगितला. शरद पवार 85 वर्षाचे होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आणू, असा निर्धार रोहित पवारांनी बोलून दाखविला.
पवार ट्रिपल डिजीटच्या नेहमीच अलीकडे
पवार गेली 60 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आहे त्यांचा आमदार निवडून आणण्याचा सर्वोच्च आकडा 72 आहे. त्या पलीकडे पवारांना 75 आमदारे कधी निवडून आणता आले नाहीत. त्या उलट 2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये भाजपने सलग दोनदा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांच्या आकड्याचे ध्येय देखील डबल डिजिटचे म्हणजे तोकडेच ठेवले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
लोकसभा निवडणुकीत देखील शरद पवारांनी महाविकास आघाडीत स्वतःच्या पक्षासाठी 48 पैकी 10 जागांवरच समाधान मानले होते. त्या 10 जागांपैकी पवारांनी 8 जागांवर राष्ट्रवादीचे खासदार निवडून आणले. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या वेळच्या आकड्यावर परत गेले. म्हणजे त्यांची मूळची ताकद लोकसभा निवडणुकीपुरती तरी पुन्हा प्रस्थापित झाली. त्या बळावर पवारांनी पवारांच्या पक्षाने किमान 100 आमदार निवडून आणण्याचे टार्गेट ठेवायला हवे होते, असे राजकीय वर्तुळात बोलले गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना जयंत पाटलांनी एकदा 100 आमदार निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. तो रोहित पवारांनी “मॉडीफाय” करून 85 आमदारांवर आणून ठेवला. त्यावेळी जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातले मतभेद पुढे आले नव्हते, पण आता पवारांचे पक्षाचे आमदार नेमके किती निवडून येतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more