NIA ने ISIS च्या 8 एजंटना अटक केली, IED स्फोटाचा कटही उधळून लावला

एनआयएने रोख रक्कम आणि डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ISIS नेटवर्क प्रकरणी दहशतवादविरोधी एजन्सी NIAने सोमवारी सकाळी 4 राज्यांमधील 19 ठिकाणी छापे टाकले. 19 ठिकाणांमध्ये कर्नाटकातील 11, झारखंडमधील 4, महाराष्ट्रातील 3 आणि दिल्लीतील एका ठिकाणाचा समावेश आहे.NIA arrests 8 agents of ISIS also foils IED blast plan



एनआयएच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून आठ इसिस दहशतवाद्यांना अटक केली आहे. एनआयएने एका ठिकाणी आयईडी स्फोटाचा कटही हाणून पाडला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बल्लारी मॉड्यूलचा नेता मिनाजचाही समावेश आहे. त्याला मोहम्मद सुलेमान या नावानेही ओळखले जाते.

एनआयएने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की छाप्यादरम्यान सल्फर, पोटॅशियम नायट्रेट आणि गनपावडर सारख्या स्फोटक सामग्रीसह प्रस्तावित हल्ल्यांचे तपशील असलेली कागदपत्रे आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. एनआयएने रोख रक्कम आणि डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत.

अटक केलेल्या दहशतवाद्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आयएम अॅप्सचा वापर केला. या लोकांनी स्फोटक पदार्थाचा वापर करून आयईडी किंवा इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस बनवण्याची योजना आखली होती. याद्वारे या लोकांना दहशतवादी हल्ले करायचे होते. अशी माहिती समोर आली आहे.

NIA arrests 8 agents of ISIS also foils IED blast plan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात