राजनाथ सिंह, अमित शाह आणि शिवराज सिंह चौहान यांचाही समावेश. New NITI Aayog team formed by central government Prime Minister Modi is the President and Suman Berry is the Vice President
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने NITI आयोगाची नवीन टीम तयार केली आहे. या टीमचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. उपाध्यक्ष सुमन बेरी यांना करण्यात आले आहे. NITI आयोगाच्या नव्या टीममध्ये चार पूर्णवेळ सदस्य आहेत. व्ही के सारस्वत, प्राध्यापक रमेश चंद, डॉ व्ही के पॉल आणि अरविंद विरमानी यांना पूर्णवेळ सदस्य करण्यात आले आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना NITI आयोगाच्या टीममध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी आणि एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी यांना विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे.
पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह आणि लालन सिंह, सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार, विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू, आदिवासी कार्य मंत्री जुआल ओरम, महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री राव इंद्रजीत. सिंग यांचीही विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App