विशेष प्रतिनिधी
पाटणा : अक्षय कुमारच्या स्पेशल २६ चित्रपटात बनावट आयकर अधिकारी बनून व्यावसायिकांच्या कोट्यवधी रुपयांची लूट करतात. अगदी तसाच प्रकार बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात घडला आहे. आयकर अधिकारी बनून आलेल्यांनी कंत्राटदाराच्या ३५ लाख रुपयांची लूट केली.New incarnation of Special 26 in Bihar, robbed of Rs 35 lakh from a contractor by becoming an income tax officer
या चित्रपटात अक्षय कुमार, अनुपम खेर आणि किशोर कदम हे आयकर अधिकारी बनून येतात. आल्यावर घरातील सगळ्या टेलीफोन लाईन कापतात. त्याचबरोबर सगळ्यांना एका खोलीत बंद करतात. अगदी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे स्कॉर्पिओमधून दोन महिलांसह सात जण बनावट आयकर अधिकारी बनून वाळू व्यावसायिक संजयकुमार सिंह यांच्या घरी गेले.
त्यावेळी ते घरी नव्हते. घरात प्रवेश करताच त्यांनी सर्वांचे मोबाइल ताब्यात घेतले व बंद केले. घराची सर्व दारे, खिडक्या बंद करून संजय सिंह यांच्या पत्नीकडे कपाटाच्या किल्ल्या मागितल्या. तेथील २५ लाख रुपये रोख व १० लाखांचे दागिने लुटले.
संजय सिंह घरी पोहोचल्यावर त्यांना हा प्रकार कळाला. त्यांना आयकर कार्यालयात बोलाविण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले. ते कार्यालयात गेले असता बिंग फुटले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तपासासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App