वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर काल सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने तब्बल 5000 पत्रांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले, तर आज नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने देखील झटका दिला आहे. Nawab Malik ED: 5000 water chargesheet against Nawab Malik yesterday; Even the shock of the Supreme Court today !!
ईडीने आपल्याला खोट्या आरोपाखाली बेकायदेशीररित्या अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग केस मधून आपले नाव वगळावे आणि दाऊद इब्राहिम अशी जोडलेला संबंध खोटा असल्यामुळे तो कायमचा तोडून टाकावा, अशी याचिका नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात केली होती.
मात्र सध्या या प्रकरणाचा तपास एका विशिष्ट वळणावर आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेची सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. नवाब मलिक यांची या आशयाची याचिका मुंबई हायकोर्टाने आधीच फेटाळली होती. त्याविरोधात नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु, आता सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर नबाब मलिक यांची केस अधिक मजबुतीने ईडी पीएमएलए आणि मुंबई हायकोर्टात लढू शकते, असे स्पष्ट झाले आहे.
Supreme Court declines to entertain a plea filed by Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik against an order of the Bombay HC which had rejected his interim application seeking immediate release in a case of money laundering being investigated by Enforcement Directorate pic.twitter.com/Q3WWhSwfCf — ANI (@ANI) April 22, 2022
Supreme Court declines to entertain a plea filed by Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik against an order of the Bombay HC which had rejected his interim application seeking immediate release in a case of money laundering being investigated by Enforcement Directorate pic.twitter.com/Q3WWhSwfCf
— ANI (@ANI) April 22, 2022
कालच ईडीने नवाब मलिक यांच्याविरोधात तब्बल 5000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच त्यांची दोन मुले आमिर आणि फराज मलिक यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टाकडे मागितली आहे. कोर्टाने परवानगी दिल्या बरोबर ईडी या दोघांनी विरोधातही आरोपपत्र दाखल करून अटक वॉरंट मागू शकणार आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना कुटुंबांपुढे कायदेशीर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर यांच्याशी असलेल्या कनेक्शन मधूनच नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आधीच जप्त केल्या आहेत. नवाब मलिक यांच्या विरोधात 5000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पीएमएलए कोर्टात याच आरोपपत्रा संदर्भात सुनावणी होऊन नवाब मलिक यांच्यावर पुढची कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. गोवावाला कंपाऊंडची 300 कोटी रुपयांची जमीन नवाब मलिक यांनी नेमकी किती रुपयांना विकत घेतल्या दाखवले, यामध्ये किती रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केले, हा पैसा नंतर कोठे गेला या संदर्भातले खुलासे आरोपपत्रात करण्यात आले आहेत, असे समजते.
नवाब मलिक यांचा मुक्काम सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची दोन्ही मुले आमीर आणि फराज मलिक यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय ईडीने घेतला आहे. या दोघांनाही दोन-तीन वेळा समन्स पाठवूनही ते दोघे चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे गोवावाला कंपाऊंड जमिनी संदर्भात चौकशी आणि तपासासाठी थेट आरोपपत्र दाखल करूनच ईडी आमिर आणि फराज मलिक यांचा चौकशीसाठी ताबा मागणार आहे.
ईडीने गोवावाला कंपाउंड त्याचबरोबर वांद्रे आणि कुर्ला परिसरातील मालमत्ता जप्त केली आहे. यात जमिनी आणि फ्लॅट्स आहेत. मंगळवारी, 12 एप्रिल रोजी इकबाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट ईडीने जप्त केला होता, आता ईडीने दाऊद कनेक्शनमध्ये अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या एकूण 8 मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईत नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कुर्ल्यातील गोवा वाला कंपाउंड : ही जमीन मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरकडून खरेदी केली होती, त्यातून त्यांचे दाऊद कनेक्शन समोर आले.
गोवावाला कंपाऊंड जवळच्या 300 कोटींच्या भूखंडाप्रकरणीच नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठीच ईडीने ही छापेमारी केली होती.
ईडीच्या 8 ते 9 अधिकाऱ्यांच्या पथकाने कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड जवळ जाऊन छापेमारी केली. या टीममध्ये एक महिला अधिकारीही होती. तेथे सीआरपीएफ जवानांचा मोठा फौजफाटाही तैनात केला होता. गोवावाला कंपाऊंड जवळ एका ज्येष्ठ व्यक्तीजवळच्या काही कागदपत्रांची छाननी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच या व्यक्तीकडून अधिकाऱ्यांनी बरीच माहिती घेतली. ईडीचे अधिकारी या व्यक्तीला भेटायला आले यावरून या व्यक्तिनेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावल्याचे दिसून येत होते.
दाऊद गँगशी संबंधित व्यक्तीकडून नवाब मलिक यांनी भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. या गोवावाला कंपाऊंडच्या बाजूलाच हा भूखंड आहे. यासंदर्भात आता नवाब मलिक यांच्यावर तब्बल 5000 पानांचे आरोपपत्र दाखल झाले आहे. यामध्ये नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरशी केलेल्या मनी लॉन्ड्रिंग संदर्भातला सगळा व्यवहार तपशीलवार नोंदवला आहे. त्यांच्या मोडस ऑपरेंडीचा खुलासा करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App