कंपनीच्या नावे फोन करून पाच लाखांची फसवणूक


कंपनीच्या नावे फोन करून मशीन खरेदीमध्ये ठरलेल्या व्यवहारातील पाच लाख रूपये दुसर्‍या खात्यावर पाठविण्यास सांगून पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – कंपनीच्या नावे फोन करून मशीन खरेदीमध्ये ठरलेल्या व्यवहारातील पाच लाख रूपये दुसर्‍या खात्यावर पाठविण्यास सांगून पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधीत बॅक खातेधारकावर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रतिक जोशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.Machin purchasing order the online payment transfer to another account and cheated the company.

प्रतिक जोशी यांची कंपनी आहे जांभुळवाडीत कंपनी आहे. त्यांच्या ओळखीचा राजस्थानचा लक्ष्मण सिंग नावाचा व्यक्ती आहे. सिंग हा मशीन फिटींगचे काम करतो. त्याची जोशी यांच्याबरोबर दहा वर्षापासून ओळख आहे. जुन्या मशीन पश्चिम बंगाल येथे असून त्या विकायचे असल्याचे त्याने जोशी यांना सांगितले.



त्यानंतर जोशी पश्चिम बंगाल येथे गेले. तेथे गुपी नावाचा एजंटला भेटले. वर्षापूर्वी त्यांच्या व्यवहार श्री गोपाल कॉन्क्रीट लिमिटेड बरोबर झाला. 46 लाख 50 हजाराला ठरला. त्यानंतर जोशी पुण्यात कोटेशन घेऊन आले. 26 ऑगस्ट 2021 रोजी पश्चिम बंगाल येथील कंपनीचा मालक सिध्दार्थ सारडा यांच्या बरोबर बोलणे होऊन

अखेर व्यवहार 32 लाखाला ठरला. तसेच अ‍ॅडव्हान्स स्वरूपात पाच लाख देण्याचे ठरले. तसेच राहिलेले पैसे मशिन पाठविताना द्यायचे ठरले होते. पश्चिम बंगालच्या त्या कंपनीनेही अकाऊंट नंबर असलेला ईमेल जोशी यांना पाठविला. 21 सप्टेंबर रोजी जोशी यांना कंपनीतून फोन आला.

त्यावेळी त्यांना आमचा अकाऊंट नंबर बदलला असून या अकाऊंटला पैसे पाठवा असे सांगण्यात आले. त्यानुसार जोशी यांनी पैसे पाठविले. त्यानंतर काही दिवसांनी जोशी यांनी सारडा यांच्याशी संपर्क साधला

असता सारडा यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे पाच लाख मिळाले नाही किंवा आम्ही कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर जोशी यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

Machin purchasing order the online payment transfer to another account and cheated the company.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात