खराडी परिसरात मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ३५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. Kharadai area police seized the mefedrown drugs
विशेष प्रतिनिधी
पुणे : खराडी परिसरात मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ३५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. चंचल महेंद्र सासी (वय २७ रा. पीएमसी बिल्डींग,चौथा मजला, औंध,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
खराडीतील चौधरी वस्ती परिसरात एकजण मेफेड्रॉन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक दोनला मिळाली. पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने चंचल सासी याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून ३५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, देशपांडे, बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आजीम शेख, योगेश मांढरे, बास्टेवाड दिशा खेवलकर यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App