कंपनीच्या संस्थापकालाच दाखविला बाहेरचा रस्ता, भारत पे कंपनीच्या अशनीर ग्रोव्हर यांची कहानी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जून 2018 मध्ये लॉन्च झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये तब्बल 21 हजार कोटी रुपये मूल्यांकन झालेल्या भारत पे या कंपनीच्या सहसंस्थापकालाच कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यांची भागीदारी 9.5% म्हणजेच 1,800-1,900 कोटी रुपये इतकी होती. आता अशनीर ग्रोव्हर यांनी सांगितले आहे की, ते भारत पेमधील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचा विचार करत आहेत.The way out was shown to the founder of the company, the story of Ashneer Grover of Bharat Pay Company

कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरधारकांपैकी एक असलेल्या 2 मार्च रोजी कंपनीच्या बोडार्ने अशनीर यांना सर्व पदांवरून काढून टाकले.2017 मध्ये पीसी ज्वेलर्स लिमिटेड कंपनीत बिझनेस हेड म्हणून काम करत असलेल्या अशनीरने शाश्वत नकरानी आणि भाविक कोलाडिया यांची भेट झाली. या भेटीत शाश्वतने अशनीरसोबत ऑनलाइन व्यवहारांसाठी अ‍ॅप बनवण्याची कल्पना शेअर केली.



अमेरिकन एक्सप्रेस, ग्रोफर्ससह अनेक कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केलेल्या अशनीरला ही कल्पना आवडली. शाश्वत तांत्रिक बाबींमध्ये पारंगत होते, तर अशनीर यांनी कंपनीची नोंदणी करण्यापासून त्याचे विपणन आणि व्यवसायाला सांभाळले.अखेर तीन मित्रांनी मिळून 2018 मध्ये ही कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

भारतातील पेटीएम आणि फोन पे यासारख्या कंपन्यांच्या तुलनेत भारत पे कंपनीच्या यशाचे कारण म्हणजे कंपनीने आपली व्यावसायिक रणनीती बनवली. भारत पे कंपनीने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी या चार मुद्यांवर भर दिला. क्यूआर कोडद्वारे ग्राहक दुकानदाराला पैसे देऊ शकतात.

तुम्ही भारत पेच्या एकाच क्यूआर कोडसह अनेक पेमेंट करू शकतात. दुकानदार भारत पे अ‍ॅपद्वारे विनामूल्य पेमेंट स्वीकारू शकतात. भारत पे अ‍ॅपद्वारे लोकांना कर्जही दिले जात आहे.भारत पे अ‍ॅपद्वारे दररोज 50 लाखांहून अधिक व्यवहार होत आहेत. एवढेच नाही तर कंपनीने दुकानदारांना त्यांच्या व्यवसायाच्या आधारावर कर्जही देण्यास सुरुवात केली.

डिसेंबर 2021 पर्यंत, कंपनीने दुकानदार आणि व्यावसायिकांना 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले आहे. मात्र, भारत पेचे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर गेल्या दोन महिन्यांपासून वादात आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला अशनीर यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता.

यामध्ये ते कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याला अपशब्द बोलताना ऐकू आले. याशिवाय कंपनीच्या नियमांविरुद्ध वर्तन केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.अशनीर आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध तक्रार मिळाल्यानंतर कंपनीने चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या तपासणीत त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर पैशांच्या हेराफेरीत गुंतल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्यांना कंपनीतून बडतर्फ करण्यात आले.त्यानंतर ग्रोव्हर यांनी स्वत:च्याच कंपनीच्या निर्णयाविरुद्ध सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राकडे अपील केले. येथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर अशनीर यांनाही भारत पे कंपनी सोडावी लागली.

The way out was shown to the founder of the company, the story of Ashneer Grover of Bharat Pay Company

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात