विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोना महामारीचा देशभरातील वाढता उद्रेक पाहता मे महिन्याच्या सुरवातीला पश्चििम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर केंद्राकडून देशव्यापी पण वेगळ्या रूपातील लॉकडाउन लावण्याबाबत राज्यांना निर्देश दिले जाण्याची शक्ययता निर्माण झाली आहे. Nationwide lockdown can be imposed once again
तज्ज्ञांच्या मते देशातील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. पंतप्रधान, कॅबिनेट सचिव, आरोग्यमंत्री, गृहमंत्री आदींकडून एकामागून एक बैठकांचा जो धडाका सुरू झाला आहे तो पाहता लॉकडाउनची शक्यता नाकारता येत नाही.
दिल्लीत गेल्या आठवडाभरात ८००० वरून २३ हजारांवर रुग्णवाढ झाल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा पुरती कोसळल्याची कबुली केजरीवाल यांनी दिली. मात्र यंत्रणा ठप्प झालेली नसल्याचा दावाही त्यांनी केला. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीमध्ये मागील २४ तासांत (रविवारी) सुमारे २३ हजार ५०० नवे रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, राजस्थान सरकारने देखील राज्यामध्ये पंधरा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. मागील चोवीस तासांमध्ये दहा हजारांपेक्षाही अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर मध्यरात्रीच हा निर्णय घेण्यात आला. आता तीन मेपर्यंत अत्यावश्यनक सेवा वगळता सगळे काही बंद राहणार आहे. महाराष्ट्र व दिल्लीत याआधीच लॉकडाउन सुरु झालेले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App