चिकित्सक , डॉक्टरांच्या भरतीसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून बंपर ऑफर


वृत्तसंस्था

पुणे : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना ग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय उपचार यंत्रणेची अवस्था दयनीय आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेवर वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची ‘ऑफर’ देण्याची नामुष्की ओढवली आहे.Physician, for the recruitment of doctors Bumper offer from Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेने तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, केरळ, नवी दिल्ली, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, आणि उत्तर प्रदेश या राज्यातील वृत्तपत्रात ३० चिकित्सक आणि १०० डॉक्टरांच्या पदभरतीसाठी जाहीरात केली आहे.



पुणे जिल्हा परिषदेकडून कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर चांगला भर दिला जात आहे. कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार तब्बल १ कोटी ९७ लाख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या पगाराव्यतिरिक्त ही रक्कम अनुक्रमे चिकित्सक आणि डॉक्टरांना दरमहा ७५ आणि ३० हजार प्रति महिना देण्यात येणार आहे.

पुण्यात शहरी भागात खाजगी हाॅस्पिटलच्या सुविधा आहेत. परंतु ग्रामीण भागात 80 टक्क्यांपेक्षा अधिक लोक हे सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. जिल्हा परिषदेने कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे सुविधा निर्माण केल्या आहेत.

मात्र आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर नसल्याने उपचार करता येत नाहीत. यासाठीच जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

यामध्ये आता पर्यंत शासनाने पुणे जिल्हा परिषदेसाठी डाॅक्टर,  नर्स,  आरोग्य सेविका, वाॅर्ड बाॅयसह औषध निर्माता, भूलतज्ज्ञ अशी विविध पदे भरली आहेत. एमडी डाॅक्टर आणि एमबीबीएस डॉक्टर देखील आहेत. यासाठी आता महाराष्ट्रासह देशातील अन्य 12 राज्यात जिल्हा परिषदेच्या वतीने जाहिरात करण्यात येणार आहे.

केवळ कोविड साथ उपचारासाठी भरती

जिल्ह्यात एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांची भरती केवळ कोविड साथीसाठी करण्यात येणार आहे. यात एमडी डाॅक्टरांना दरमहा दीड लाख तर एमबीबीएस डॉक्टरांना दरमहा 90 हजार रुपये पगार देण्यात येईल.

Physician, for the recruitment of doctors Bumper offer from Pune Zilla Parishad

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात