Job Alert : पुणे जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीची संधी ; थेट मुलाखतीद्वारे निवड


विशेष प्रतिनिधी 

पुणे : पुणे जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार आहे. आरोग्य विभागातील 1 हजार 521 रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.Job Alert: Government Job Opportunity in Pune Zilla Parishad; Selection by direct interview

उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांच्या 4 ते 7 एप्रिल दरम्यान थेट मुलाखती होणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मुलाखती होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. याबाबतची जाहिरात पुणे जिल्हा परिषदेच्या https://punezp.mkcl.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

आरोग्य विभागात भरल्या जाणा-या रिक्तपदामध्ये विशेषतज्ज्ञ (फिजिशियन), भूलतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी , दंतरोग तज्ज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एएनएम, क्ष- किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, डाटा एंट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे.

ही सर्व पदे कोरोना प्रतिबंधासाठी सुरु केलेल्या जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालयासाठी राहतील. किमान 3 महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्त्वावर भरले जाणार असल्याची माहिती जि. प.च्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.

उमेदवाराची पात्रताः
यासाठी एम.डी. (मेडिसिन), एम.डी.किंवा डी.एन.बी. (ॲनेस्थेशिया), एम.बी.बी.एस., बी.ए.एम. एस., बी.डी. एस., जी.एन.एम किंवा बी एस्सी
(नर्सिंग), एएनएम, क्ष-किरण तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण, बी एस्सी, डीएमएलटी, डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.

मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्रेः
मुलाखतीसाठी लागणारी आवश्यक कागपत्रे पुढील प्रमाणेः वयाचा पुरावा, पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, एक छायाचित्र आदी.

पदनिहाय प्रमुख रिक्त जागा खालीलप्रमाणे –

1) वैद्यकीय अधिकारी – 537

2) नर्स (परिचारिका) -434

3) एएनएम -290

4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17

5) ईसीजी तंत्रज्ञ -24

6) क्ष-किरण तंत्रज्ञ – 15

7) रुग्णालय व्यवस्थापक – 27

8) औषधनिर्माता – 34

9) भूलतज्ज्ञ – 22

10) फिजिशियन – 16

 

Job Alert: Government Job Opportunity in Pune Zilla Parishad; Selection by direct interview

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात