MAHARASHTRA LOCKDOWN : निर्बंध होणार कडक;मुंबईत वाहनांवर ३ प्रकारचे कलर कोड


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण, तरीही रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याचे नाव नाही. त्यामुळे आता मुंबईतील रस्त्यावर फिरणे आणखी कठीण होणार आहे. कारण, पोलिसांकडून गाड्यांना वेगवेगळ्या रंगाचे कोड देण्यात येणार आहेत.color code for bike and car in mumbai

यापुढे आता मुंबईत खाजगी वाहनांवर 3 प्रकारचे कलर कोड लागणार आहे. कलम 144 नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गांड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे.

  • या गाड्यांवर लावण्यात येणारे हे 6 इंचाचं गोलाकार स्टिकर असतील. गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर हे स्टिकर लावण्यात येतील.
  • अत्यावश्यक वाहनांवर पिवळ्या रंगाचा कोड असणार आहे.
  • तर मेडिकल सेवा वाहनांवर लाल रंगाचा कोड असणार आहे. जीवानावश्यक सेवेतील भाज्यांचा वाहनांवर हिरव्या रंगाचे कोड असणार आहे.

तिन्ही रंगाचे कोड हे मुंबई पोलीस आणि स्थानिक पोलीस देणार आहे. जर या कलर कोडचा दुरुपयोग केल्यास कलम 419 नुसार कारवाई केली जाणार आहे.

स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे आदेश दिलेत.

“टोलनाक्यांवर तपासणीमुळे डॉक्टर, अॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय साधनांच्या गाड्या अडकत आहेत. यासाठी कलर कोड पॉलिसी सुरू करतोय. अत्यावश्यक सेवेतील लोकांना गाड्यांवर स्टिकर लावावे लागतील,” असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

पोलीस, महानगरपालिका, पत्रकार , डॉक्टर, अशा प्रकारे पोस्टर लावून काहीजण फायदा घेत आहेत. त्यामुळे गाड्यांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेसाठी काम करत आहेत का, याची तपासणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

“महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेला लॉकडाऊन चांगल्याप्रकारे आपल्याला पार पाडायचा आहे,” असंही हेमंत नगराळे म्हणाले.

 

color code for bike and car in mumbai

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात