पुण्यात आजपासून “सक्षम” संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन; शोभायात्रा आणि प्रदर्शन घेतील लक्ष वेधून!!

National convention of "Saksha" organization from today in Pune

दिव्यांगांच्या सक्षमीकरणावर होणार चर्चा; प्रेरक दिव्यांग पाहुणे राहणार उपस्थित

विशेष प्रतिनिधी

पुणे : समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’) या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेचे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत उद्या, शनिवार दिनांक ८ आणि ९ जून रोजी होत आहे,या अधिवेशनाला देशभरातून ५०० जिल्ह्यातील १५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शुक्रवारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज, महामंत्री कमलाकांत पांडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अविनाश वाचासुंदर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे यांनी येथे दिली. National convention of “Saksha” organization from today in Pune

या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन आज शनिवार, दि.८ जून रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रेरणादायी दिव्यांग अतिथी म्हणून इंदूरचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जलतरणपटू पद्मश्री सत्येंद्रसिंग लोहिया, महाबळेश्वरचे प्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया, अभिनेत्री गौरी गाडगीळ, अहमदाबादचे प्रसिद्ध आयटी उद्योजक शिवम पोरवाल उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शन आणि स्टॉल्सचे उद्घाटन सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अधिवेशन स्थळावर मांडलेल्या विशेष दिव्यांग विषयक प्रदर्शनी आणि विविध संस्थांचे स्टॉल्सचे उद्घाटन झाले.

गोविंद राज (राष्ट्रीय अध्यक्ष, सक्षम) : सामाजिक, व्यावहारिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इत्यादी जीवनाच्या विविध क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना एकसंधतेचा अनुभव येईल असे वातावरण निर्माण करण्यासाठी सक्षम कटिबद्ध आहे. तसेच, ते स्वावलंबन, स्वाभिमान आणि सन्मानाने जगू शकतात आणि राष्ट्राच्या पुनर्रचनेत सक्रिय भूमिका बजावू शकतात. हा दृष्टिकोन समोर ठेवून या अधिवेशनात चर्चा होणार आहे.

कमलाकांत पांडे (महामंत्री सक्षम) : सक्षम ही एक देशव्यापी काम करणारी राष्ट्रीय संघटना आहे. विविध प्रकारच्या दिव्यांग क्षेत्रात सेवा कार्य सद्या सुरू आहेत. संघटनेमध्ये कार्यकर्त्यांद्वारा केलेले काम आणि संपूर्ण देशभरात असलेली कार्यकर्ते यांच्या प्रगतीसाठी हे अधिवेशन एक प्रेरणा स्त्रोत ठरणार आहे. त्यामुळे एका जागेवर एकत्र येऊन आपल्या आगामी कामाचा आढावा घेण्यात येईल. या अधिवेशनातून काही शिकण्यासाठी आणि त्यातून ऊर्जा मिळवण्यासाठी हे एक राष्ट्रीय अधिवेशन प्रेरणादायी ठरेल. हे अधिवेशन दर तीन वर्षाच्या कालावधीत घेण्यात येते. यंदा पुण्यासारख्या पवित्र ठिकाणी हे अधिवेशन पार पडत आहे. यात देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले कार्यकर्ते येथे एकत्र होत आहेत. या तीन दिवसाच्या अधिवेशनामध्ये विविध प्रकारचे ठराव, दिव्यांग संदर्भातले योजना मांडण्यात येणार आहेत. भविष्यातल्या योजना कार्यकर्ते आखतील आणि आपल्या कामाचे निरीक्षण या तीन दिवसात करतील. या माध्यमातून कार्यकर्ता घडवण्याचे काम होईल आणि यातून त्यांना शक्ति मिळेल. यात सरकार, समाज आणि अन्य समाजसेवी संघटना मिळून सहभागी होत आहेत.

डॉ. अविनाश वाचासुंदर (राष्ट्रीय उपाध्यक्ष, सक्षम) : सक्षम ही एक दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना आहे. संघ परिवारातील हे सगळ्यात नवे अपत्य आहे. भौगोलिकदृष्ट्या सर्व देशभर, म्हणजे सर्व प्रांतांच्या मध्ये आणि जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सक्षम कार्यरत आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. नवीन नियमांच्या प्रमाणे दिव्यांगांचे २१ प्रकार आहेत. या सर्व प्रकारांमध्ये सक्षम कार्य करते सक्षमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या व्यक्ती यात सहभागी आहेत. यात डॉक्टर, तांत्रिक विशेषज्ञ म्हणजे ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपीस्ट, ऑप्टिमेट्रीस्ट अशी मंडळी देखील आहेत. तसेच प्रत्यक्ष दिव्यांग व्यक्ती सुद्धा या मध्ये सहभागी आहेत. सर्व समावेशक अशी ही संघटना दिव्यांगांच्या सर्व क्षेत्रांमध्ये काम करते. समाजातील अत्यंत जरुरीच्या पण तरीही दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग क्षेत्रातील या संघटनेच्या कामाची ओळख व्हावी म्हणून वैद्यक क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार मंडळींसाठी एक कार्यक्रम रविवारी सकाळी सकाळी साडेअकरा वाजता या अधिवेशनात आयोजित करण्यात आला आहे.

ॲड. मुरलीधर कचरे, ( प्रांत अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, सक्षम) : यंदा सक्षमचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यामध्ये होत आहे. या अधिवेशनाचे यजमान होण्याचे भाग्य पश्चिम महाराष्ट्राला मिळालेले आहे, ही पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पंधराशे कार्यकर्ते सगळे देशभरातून येणार आहेत. त्यांचे स्वागत , त्यांच्या व्यवस्था इथल्या पुणे महानगरपालिका कार्यकर्त्यांनी व पश्चिम महाराष्ट्राच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून मार्गाला लावलेली आहे. हे अधिवेशन अधिक चांगलं व्हावं या दृष्टीने सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. यामध्ये दोन दिवस खूप चांगले विषय होणार आहेत. दिव्यांगांच्या एकूणच कल्याणासाठी आणि धोरण ठरवण्यासाठी काही विषय या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे काही कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित राहणार करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसंघाचे माननीय सहकार्यवाह दत्ताजी होसबाळे आणि अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे सानिध्य उद्घाटन सत्राला कार्यकर्त्यांना लाभणार आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे माननीय भैयाजी जोशी यांचाही सुद्धा सहवास सर्व कार्यकर्त्यांना लाभणार आहे. दोन दिवस हे अधिवेशन उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कार्यकर्ते सतर्क आहेत.

National convention of “Saksha” organization from today in Pune

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात