विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात काहीच मोफत देऊ नका. पण द्यायचेच असेल, तर ते सशर्त द्या, असा परखड सल्ला प्रख्यात आयटी उद्योग महर्षी एन. आर. नारायण मूर्ती यांनी दिला.Narayan Murthy’s solid advice for the development of the country
भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला देणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती पुन्हा एकदा नव्या वक्तव्यातून चर्चेत आले. सरकारने पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्राधान्याने हाताळले पाहिजेत आणि त्यासाठी उद्योगातील लोकांना 3 शिफ्टमध्ये काम करावे लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नारायण मूर्ती म्हणाले, की भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन डॉलर्सची आहे, तर चीन 19 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. एकेकाळी तिथेही आपल्यासारख्याच समस्या होत्या, पण चीनने त्यावर उपाय शोधून काढला आणि आपल्या पुढे गेला. आपण अजूनही चीनशी बरोबरी करू शकतो आणि त्यांच्या पुढे जाऊ शकतो, पण त्यासाठी आपल्याला वेगाने निर्णय घ्यावे लागतील.
बंगळुरू येथील टेक समिट 2023 च्या 26 व्या आवृत्तीत झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी ‘पुढील 5-10 वर्षांत बंगळुरूने एक चांगले शहर बनण्यासाठी काय केले पाहिजे?’, असे विचारल्यावर नारायण मूर्ती म्हणाले की, परदेशातील लोक दोन शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळेच ते आपल्यापेक्षा पुढे आहेत.
नारायण मूर्ती आठवड्यातून 80-90 तास काम करतात; पत्नी सुधा मूर्ती म्हणाल्या- त्यांचा खऱ्या मेहनतीवर विश्वास
मोफत द्यायचेच, तर सशर्त द्या!!
मी मोफत सेवांच्या विरोधात नाही, पण जे मोफत सेवा आणि अनुदान सरकार घेत आहेत, अशा सर्व लोकांनी याच्या मोबदल्यात समाजाच्या कल्याणासाठी योगदान द्यावे . मोफत योजना या सशर्त असायला हव्यात. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील उपस्थिती 20 % वाढली तरच या सेवा उपलब्ध होतील, असे सरकारने स्पष्ट सांगावे, असे परखड वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केले.
मूर्ती म्हणाले, लोक आपल्या मुलांना कन्नड माध्यमाच्या शाळेत पाठवत नाहीत. त्यांची मुले नेहमीच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची आणि चालवण्याची परिसंस्था सुलभ आणि मोफत करण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App