विशेष प्रतिनिधी
मुंबई : हरियाणा काँग्रेसला पराभव पत्करावा लागला त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे + पवारांच्या पक्षांना काँग्रेसवर कुरघोडी करायची संधी मिळाली. संजय राऊतांनी सामनात अग्रलेख लिहून आणि नंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसला ठोकून काढले. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाच्या वादाचा वचपा राऊतांनी या निमित्ताने काढून घेतला. पण म्हणून महाराष्ट्रातले काँग्रेस नेते फारसे बधलेले दिसत नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या युक्तीवादावर जोरदार पलटवार केला.
हरियाणातला भाजपचा विजय फार काही मोठा नाही. कारण त्यांनी तिथे अपक्षांची मते खेचून घेतली. हरियाणातला विजय झाल्याने त्याचा महाराष्ट्रात परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेते आहेत, असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
Nobel Prize : AI गॉडफादर जेफ्री ई. हिंटन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
राऊतांच्या नेमक्या याच वक्तव्यावरून नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे “जागरूक” नेते आहेत, असे संजय राऊत यांना सांगावे तरी का लागते??, असा खोचक सवाल नानांनी केला. संजय राऊत सामनामध्ये काय लिहितात, ते काय बोलतात, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यांना हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधला फरक कळत नसेल, तर तो त्यांचा विषय आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी फारशी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. आजचा अग्रलेख वस्तुस्थितीला धरून होता की मुद्दामून लिहिला होता, हे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विचारू, पण महाराष्ट्रातले जागावाटप आम्ही मेरिटनुसारच करू, असे नानांनी ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना सुनावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App