नाशिक : तरुणांचे केले “कोळसे”, ज्येष्ठांना आणले “बाळसे” म्हणून काँग्रेसला सतत पराभवाचे तोंड दिसे!!, ही अवस्था काँग्रेसच्या हरियाणातला पराभवानंतर अधिक अधोरेखित झाली.
काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारणे वेगवेगळ्या माध्यमांनी समोर आणली, पण त्यामध्ये मतांची टक्केवारी राहुल गांधींचा प्रचार त्यांनी सेट केलेले नॅरेटिव्ह वगैरे मुद्द्यांवरच माध्यमांनी भर दिला, पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसला वेगवेगळ्या राज्यांमध्ये सतत पराभवाचे तोंड का पाहावे लागते??, ते केवळ राहुल गांधींच्या नेतृत्व अक्षमतेत आहे का??, याची मात्र कारण मीमांसा कुठल्या माध्यमांनी केली नाही.
मूळात काँग्रेस कुठला “राजकीय प्रयोग” करण्यास विसरून गेली आहे. राहुल गांधी वर्षानुवर्षे काँग्रेसचे युवा नेते राहिले, पण राज्यांमध्ये मात्र काँग्रेसने युवा प्रतिभेला फारसे समोरच आणायचा प्रयत्न केला नाही. याचे उदाहरण राजस्थानच्या निवडणुकीतून समोर आले होते. राजस्थानात काँग्रेसने 77 वर्षांच्या अशोक गेहलोत यांच्यावर वारंवार विश्वास ठेवला पण 40 – 50 वयाच्या सचिन पायलट यांना कधीच नेतृत्वाची संधी दिली नाही. सचिन पायलट यांनी दोनदा बंड करून पाहिले, पण काँग्रेस हायकमांडने ते बंड “यशस्वी” हाताळल्याचे दाखवून अखेरीस राजस्थानात पराभवाचे तोंड पाहिले, पण सचिन पायलट यासारख्या तरुण नेतृत्वाकडे मुख्यमंत्री पद सोपवून “राजकीय प्रयोग” करणे टाळले.
छत्तीसगडच्या निवडणुकीत देखील काँग्रेसने भूपेश बघेल यांच्यावर वारंवार विश्वास दाखविला, पण टी. एस. सिंगदेव किंवा बाकी कुठल्याही तरुण नेतृत्वाकडे सूत्रे सोपविण्याचा “राजकीय प्रयोग” नाकारला. वास्तविक छत्तीसगडच्या निवडणुकीचे एक्झिट पोल देखील काँग्रेसला अनुकूलच निकाल दाखवत होते, पण प्रत्यक्ष मतमोजणी भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
Harshvardhan Patil : हर्षवर्धनना पक्षात घ्यायची पवारांची घाई; इंदापूरातल्या पवार निष्ठावंतांचाच उद्रेक होई!!
वास्तविक छत्तीसगड आणि राजस्थान या दोन निवडणुकांमधला अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसने हरियाणात “राजकीय प्रयोग” करून बघायला काहीच हरकत नव्हती. भूपेंद्र सिंग हुड्डा या 78 वर्षांच्या नेत्याच्या अनुभवाचा राजकीय लाभ घेऊन कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला किंवा अन्य कुठल्या तरुणाकडे नेतृत्व सोपवायला काहीच हरकत नव्हती. पण प्रत्यक्षात काँग्रेस भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्यावरच अतिरिक्त विश्वास दाखविला. तो नुसता विश्वासच दाखवला असे नाही, तर निवडणुकीची सगळी सूत्रे त्यांच्याकडेच सोपविली. तिकीट वाटपात हुड्डा यांचाच वरचष्मा ठेवला. यातून हरियाणा जो परिणाम दिसायचा तो दिसलाच.
वास्तविक अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि भूपेंद्रसिंग हुड्डा यांना काँग्रेसने राजकीय करिअरमध्ये काही कमी दिले नव्हते. या सगळ्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द 10 वर्षांपेक्षा अधिक राहिली. त्यामुळे त्यांना बाजूला करून नव्या तरुण नेतृत्वाकडे सूत्रे सोपविण्याचा “राजकीय प्रयोग” करणे काँग्रेसला सहज शक्य होते पण काँग्रेसने ते केले नाही.
भाजपने राजकीय टाइमिंग साधून मनोहरलाल खट्टर यांचे नेतृत्व बदलले. त्यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी देऊन ओबीसी नेते नायब सिंग सैनी यांच्यावर “राजकीय प्रयोग” करत नेतृत्व सोपविले. सोशल इंजिनिअरिंगचा व्यापक प्रयोग करून हरियाणातल्या जाट वर्चस्वाच्या राजकारणाला धक्का दिला. राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा वारंवार उपस्थित करून प्रत्यक्षात जाट वर्चस्वाच्या राजकारणाला हवा दिली होती. म्हणूनच त्यांनी 78 भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्याकडेच सूत्रे सोपविली होती. हरियाणात “राजकीय प्रयोग” करायला काँग्रेस घाबरली. त्याचा फटका निवडणुकीत बसला. या कारणाकडे माध्यमांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App