विशेष प्रतिनिधी
मुंबई : हरियाणा काँग्रेसला भाजपकडून सत्ता खेचण्याचा अपयश आल्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसला टोले हाणले, पण रोहित पवारांनी मात्र शहाजोगपणे शिंदे + अजितदादांना उपदेशाचे डोस पाजले!!
हरियाणातल्या पराभवातून काँग्रेसने धडा शिकावा. एक विशिष्ट भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकीला सामोरे जावे, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी काँग्रेसला टोले हाणले. सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. यशाचे रूपांतर अपयशात कसे करावे हे काँग्रेसकडून शिकावे काँग्रेसने अति आत्मविश्वासाने मित्र पक्षांना बरोबर घेतले नाही. त्याचा परिणाम त्यांना हरियाणा भोगावा लागला. पण त्यांनी महाराष्ट्रात असे करू नये, असे संजय राऊत म्हणाले.
पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने “उपदेशात्मक” भाषा वापरली. रोहित पवार स्व पक्षाविषयी बोलायचे सोडून नेहमी लहान तोंडी मोठा घास घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वगैरे नेत्यांना देशाच्या धोरणाबद्दल “उपदेश” करत असतात. तसाच “उपदेश” त्यांनी हरियाणातल्या काँग्रेसच्या पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना केला.
हरियाणात भाजपच्या मित्र पक्षाला 0 जागा मिळाल्या. दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीत 10 जागा मिळाल्या होत्या. पण ते भाजप बरोबर गेले. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला. अमित शाह यांनी 2029 मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर भाजपची सत्ता आणायची असे सांगितले आहे. यातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे, असे रोहित पवार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App