वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अब्जाधीश एलन मस्क ( Elon Musk ) यांची कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले. रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव आणि नासाचे अंतराळवीर निक हेग या यानात होते. अंतराळयान वाहून नेणाऱ्या फाल्कन 9 रॉकेटने शनिवारी दुपारी फ्लोरिडातील केप कॅनवेरल लॉन्च पॅडवरून उड्डाण केले.Elon Musk
5 जूनपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे पृथ्वीवर परत आणले जाईल. या चार आसनी रॉकेटमध्ये दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या वर्षी 5 जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये ISS मध्ये पाठवण्यात आले होते.
सुनीता आणि बुच विल्मोर 116 दिवसांपासून अंतराळात अडकून
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या वर्षी 5 जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये ISS मध्ये पाठवण्यात आले होते. दोघेही 29 सप्टेंबरपर्यंत 116 दिवस तिथे अडकून आहेत.
नासाच्या प्रमुखांनी 24 ऑगस्टला सांगितले होते की, सुनीता विल्यम्स आणि बुच 6 महिन्यांनंतर फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर परततील. बोइंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये अंतराळवीरांना आणणे धोकादायक ठरू शकते, असे नासाने मान्य केले होते.
नासाने सांगितले होते की सुनीता आणि बुच विल्मोर फेब्रुवारीमध्ये एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून परततील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more