खासदार कमलेश पासवान यांनी लोकसभेतच राहूल गांधींना सुनावले, म्हणाले तुमच्या पक्षाची आमच्यासाठी काही करण्याची लायकीच नाही


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणावेळी भाजपाचे खासदार कमलेश पासवान यांचा चांगला दलीत नेता परंतु चुकीच्या पक्षात असल्याचे म्हणत त्यांना कॉँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. यावर लोकसभेतच राहूल गांधींना सुनावत पासवान म्हणाले तुमच्या पक्षाची आमच्यासाठी काही करायची लायकीच नाही. माझ्या पक्षाने माझ्यासाठी खूप केले आहे.MP Kamlesh Paswan told Rahul Gandhi in the Lok Sabha that your party has nothing to do for us.

राहूल गांधींनी भाषणात पासवान यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांचे भाषण झाल्यावर खासदार कमलेश पासवान उभे राहिले. ते म्हणाले, संसदेतील भाषणात राहुल गांधींनी माझ्य नावाचा उल्लेख केल्याने मला त्यायवर बोलायचे आहे. राहुल गांधी म्हणाले की मी चुकीच्या पक्षात आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, आज बनसगावचा खासदार झाल्यावर मी लोकसभेत बोलू शकतो ते पक्षामुळेच. माझ्या पक्षाने मला तीन वेळा खासदार केले. मला आणखी काय हवंय? पासवान म्हणाले.



काँग्रेसने नेहमीच देशाचे विभाजन केले आहे, असा आरोप करून पासवान म्हणाले, काँग्रेसला ते परवडणारे नाहीत. त्यांनी सवाल केला की तुमची तत्वे काय आहेत्य तुमच्या आजी आणि वडलांची तत्वे काय होती? राहुल गांधी म्हणाले की त्यांच्या वडिलांची हत्या झाली. माझ्या वडिलांचीही सभेत हत्या झाली. ते दु:ख मलाही आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहूल गांधी म्हणाले होते की, तुम्ही कोणाचेही ऐकत नाही. भाजपमधील माज्या लाडक्या बंधुू-भगिनींचेही ऐकत नाही. आज माझे दलित सहकारी मी पासवानजी यांना बोलताना पाहिले. त्यांना दलितांचा इतिहास माहीत आहे.

3000 वर्षांपासून दलितांवर कोणी अत्याचार केले हे त्यांना माहीत आहे. ते संकोचून बोलत नाही. पण न बोलताही ते खूप बोलून गेले आहेत. मला त्यांचाा अभिमान आह. त्यांच्या मनात जे आहे ते माझ्याशी बोलले आहेत. ते चुकीच्या पक्षात आहेत. पण काळजी करू नका. घाबरू नका.

कमलेश पासवान उठून बोलायला लागल्यावर सभागृहात खूप गोंधळ उडाला. त्यावर राहूल गांधी म्हणाले, मी लोकशाहीवादी आहे. मी त्यांना बोलून देईन. यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सभागृहात कोणाला बोलू द्यायचे हे ठरविण्याचा अधिकार राहूल गांधी यांना नाही.

यांचा उल्लेख केल्यावर पासवान विरोधासाठी उभे राहिले आणि सभागृहात गोंधळ उडाला. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. मी त्यांना बोलू देईन असे राहुल गांधी म्हणाले. यावर सभापती ओम बिर्ला म्हणाले की, राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही.

MP Kamlesh Paswan told Rahul Gandhi in the Lok Sabha that your party has nothing to do for us.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात