विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानच्या महसूल मंत्र्यांन सेक्स स्कॅँडलमध्ये फसविण्याचा डाव एका ब्युटीशियनने आखल्याचे उघडकीस आले आहे. या मॉडेलला रिपोर्टर बनवून मंत्र्यांकडे पाठविण्यात आले. मॉडेलने या दबावाला कंटाळून सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.Rajasthan’s revenue minister tricked into sex scandal, model sent as reporter
जोधपूरमध्ये हॉटेल लॉडर्समध्ये एका मॉडेलने आत्महत्येचा प्रयत्न केला. या चौकशीदरम्यान राजस्थानच्या महसूल मंत्री रामलाल जाट यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दीपाली आणि तिच्या मित्रांचा हा डाव फसल्यावर ते फरर झाले आहेत.
या मॉडेलला मंत्र्यांच्या एका जनसुनवाईमध्ये पाठविण्यात आले होते. त्यानंतर तिने मंत्र्यांना एकटीने भेटावे यासाठी आग्रह सुरू केला. परंतु, त्यांनी नकार दिला.दीपाली हिने या मॉडेलला ब्रेक देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी उदयपूरमध्ये पंधरा दिवस शुटींगही केले.
त्यानंतर तिच्यावर मंत्र्यांना फसविण्यासाठी दबाव आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरूवात केली. दीपाली हिने भीलवाड़ाच्या सर्कीट हाऊसमध्ये रामलाल जाट यांना भेटायला गेली होती. त्यांना काही कागदपत्रे दाखविली.
त्यांनी स्पष्ट सांगितले की या कागदपत्रांचा विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाही. यावर दीपालीने त्यांना एका मुलीला भेटण्याची ऑफर दिली. या मॉडेलला एका हॉटेलात थांबविण्यात आले होते. तेथे मंत्र्यांना येण्यासाठी आग्रह करण्यात येत होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App