राष्ट्रगीताचा अपमान : मुंबई न्यायालयाने ममता बॅनर्जींना बजावले समन्स, २ मार्चला हजर राहण्याचे निर्देश


मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बॅनर्जी यांच्या गेल्या वर्षी मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने त्यांना हा आदेश दिला. मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी यासंबंधी तक्रार केली आहे.Insult to national anthem Mumbai court issues summons to Mamata Banerjee, orders her to appear on March 2


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बॅनर्जी यांच्या गेल्या वर्षी मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने त्यांना हा आदेश दिला. मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी यासंबंधी तक्रार केली आहे.

न्यायालयाने असेही म्हटले आहे की, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्या तरी, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मंजुरीची आवश्यकता नाही आणि त्या त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावत नसल्यामुळे कोणताही प्रतिबंध लागू नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या कार्यक्रमासंदर्भात न्यायालयाने ही माहिती दिली. 

भाजपच्या मुंबई युनिटचे कार्यकर्ता विवेकानंद गुप्ता डिसेंबर 2021 मध्येच तक्रार घेऊन माझगाव येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात पोहोचले होते. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता. गुप्ता यांनी या प्रकरणी बॅनर्जींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.

बॅनर्जी यांनी प्रथमदर्शनी अपमान केल्याचे न्यायालयाने म्हटले

न्यायालयाने म्हटले की, तक्रार, तक्रारदाराचे म्हणणे, व्हिडिओ क्लिप आणि यूट्यूबवरील व्हिडिओवरून हे प्रथमदर्शनी स्पष्ट होते की, आरोपीने राष्ट्रगीत गायले आणि अचानक थांबवले आणि नंतर स्टेजवरून निघून गेल्या. यावरून प्रथमदर्शनी हे सिद्ध होते की आरोपीने राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या कलम 3 अंतर्गत दंडनीय गुन्हा केला आहे.

गतवर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. येथे त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली. तक्रारदार गुप्ता यांचा दावा आहे की, बॅनर्जी यांनी गृह मंत्रालयाच्या 2015 च्या आदेशाचे उल्लंघन केले आहे ज्यामध्ये राष्ट्रगीत वाजत असताना किंवा गायले जात असताना तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहणे आवश्यक आहे.

Insult to national anthem Mumbai court issues summons to Mamata Banerjee, orders her to appear on March 2

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण