अयोध्येतील राम मंदिरात बसवले जाताय दहा पेक्षा अधिक सोनेरी दरवाजे!

Ram temple in Ayodhya

हत्ती आणि कमळ बसवले जात असून त्यावर हिंदू धर्माची चिन्हे कोरलेली आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. रामल्लाच्या स्वागतात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी शहरातील सजावटीपासून ते मंदिरातील प्रत्येक काम चोख आणि संपूर्ण स्वच्छतेने करण्यात येत आहे. सध्या मंदिराच्या आतील दरवाजे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. मंदिराच्या विविध भागात दहा पेक्षा जास्त सोन्याचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. या दरवाज्यांवरील सोन्याच्या मुलाम्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.More than ten golden doors are installed in Ram temple in Ayodhya



राम मंदिराच्या वेगवेगळ्या प्रवेश ठिकाणी हे सोन्याचे दरवाजे बसवले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या आत एकूण 14 सोन्याचे दरवाजे बसवले जाणार आहेत. प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू असताना, २२ जानेवारीपर्यंत कोणतेही काम शिल्लक राहू नये म्हणून हे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.

मंदिराला आत्तापर्यंत चार दरवाजे बसवण्यात आले आहेत, आता 10 दरवाजे बसवण्याचे काम बाकी आहे, जे पूर्ण होत आहे. या सोन्याचा मुलामा असलेल्या कोरीव दरवाज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. आज सकाळपर्यंत मंदिरात 4 दरवाजे बसवण्यात आले होते.

हे सोन्याचे दरवाजे अतिशय सुंदर कोरले गेले आहेत. त्यावर हिंदू धर्माशी संबंधित चिन्हे आणि प्रतीक दिसतात. या दरवाजांवर हत्ती, भगवान विष्णू आणि स्वागत मुद्रेतील देवीच्या चित्रांसह कमळाची फुले सुंदर कोरलेली आहेत. मंदिराच्या दरवाजाचे कंत्राट हैदराबादच्या अनुराधा टिंबर कंपनीला देण्यात आले आहे. हैदराबादस्थित अनुराधा टिम्बर्स इंटरनॅशनल कंपनीचे संचालक सरथ बाबू यांनी एनडीटीव्हीला एका विशेष मुलाखतीत सांगितले होते की, ज्या गर्भगृहात ५ वर्षांच्या छोट्या रामललाची मूर्ती बसवली जाईल, त्याचे दरवाजे ८ फूट उंच, १२ फूट रुंद असतील आणि सहा इंच जाड असतील.

More than ten golden doors are installed in Ram temple in Ayodhya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात