वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जगावर कोरोनावर जालीम औषध शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.मात्र २ आठवड्यापूर्वी लॉन्च झालेले औषध उपचारासाठी फायदेशीर आहे. कोरोना संकटात एक दिलासादायक रिपोर्ट समोर आला. आता कोरोनावर उपचारात फायदेशीर ठरणारी मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपीचा वापर भारताने सुरू केला आहे. दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपीचा वापर केला. त्याचे परिणाम चकित करणारे होते. Monoclonal Antibody Therapy for Covid 19 Patient Is Useful
मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपीचा वापर ज्या कोविड रुग्णांवर केला त्या दोन रुग्णांची तब्येतीत १२ तासांत सुधारणा झाली. सर गंगाराम हॉस्पिटलच्या मेडिकल डिपार्टमेंटच्या सीनियर कंन्सल्टेंट डॉक्टर पूजा खोसला यांनी ही माहिती दिली.
३६ वर्षीय एका आरोग्य कर्मचाऱ्याला अतिताप, खोकला, अंगदुखी आणि थकवा जाणवत होता. तसेच शरीरात पांढऱ्या पेशी कमी होत चालल्या होत्या. मंगळवारी म्हणजे आजाराच्या सहाव्या दिवशी त्यांना मोनोक्लोनल एंटीबॉडी कॉकटेल देण्यात आलं होतं. या रुग्णाला ५ दिवसापर्यंत अतिताप होता. शरीरातील पांढऱ्या पेशीची पातळी २६०० पर्यंत आली होती. त्यानंतर सहाव्या दिवशी आम्ही त्यांना मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपी दिली. यानंतर ८ तासांतच रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर १२ तासानं रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला अशी माहिती डॉक्टर पूजा खोसला यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App