नोबेल पुरस्कार विजेत्याचा हिंसक चेहरा; शेख हसीनांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा घातक इरादा!!

बांगलादेशातल्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ञ हिंस्र राज्यकर्त्याचा शेख हसीना यांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा बेत असल्याचा डाव समोर आला आहे. पाकिस्तानातला लष्करशहा जनरल झिया उल हक याने ज्या पद्धतीने जुल्फिकार अली भुट्टो याला फाशी दिले आणि आपल्या लष्करी राजवटीतल्या मार्गातला राजकीय काटा दूर केला, त्याच पद्धतीने बांगलादेशातला नोबेल पुरस्कार विजेता हिंस्र राज्यकर्ता मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांचा राजकीय काटा काढायचा बेत रचलाय.

नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्या ग्रामीण फाउंडेशनच्या वेगवेगळ्या गैरव्यवहारांना शेख हसीना यांनी आपल्या राजवटीच्या काळात चूड लावला होता. मोहम्मद युनूस यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा अर्थतज्ञ म्हणून प्रतिमा असली, तरी त्याने बांगलादेशात आर्थिक घोटाळा केला म्हणून शेख हसीना यांनी मोहम्मद युनूसला जबाबदार धरले होते. पण विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली झालेल्या जिहादी उठावातून मोहम्मद युनूस बांगलादेशात सत्तेवर आला. त्याच्याच राजवटीत बांगलादेशात हिंदूंचे हत्याकांड झाले.



पण आता त्याच्या राजवटीने शेख हसीना यांच्या विरोधात सूड उगवण्यासाठी पावले टाकली आहेत. मोहम्मद युनूस आता शेख हसीना यांचा राजकीय काटा कायमचा दूर करायच्या बेतात आला आहे.

– भुट्टोला फाशी

पाकिस्तानचा लष्करशहा जनरल झिया उल हक याने जुल्फिकार अली भुट्टो याला एका राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या हत्येमध्ये गोवले होते. झियाच्या राजवटीने भुट्टो विरोधातला खटला पाकिस्तानच्या हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत चालविला होता. भुट्टोला फाशीची शिक्षा करून ती प्रत्यक्ष अंमलात आणण्यात जनरल झियाने स्वतः लक्ष घातले होते.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला मोहम्मद अहमद कसुरी हा नेता जुल्फिकार अली भुट्टो यांचा कट्टर विरोधक होता. 1974 मध्ये लाहोर मध्ये मध्यरात्री मोहम्मद अहमद कसुरी याच्या कार वर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून त्याची हत्या केली. त्याचा मुलगा अहमद कसुरी याने पोलिसांमध्ये एफआयआर नोंदविताना सुरुवातीलाच जुल्फिकार अली भुट्टो याचेच नाव घेतले. सुरुवातीला पोलिसांनी त्या संदर्भात आढेवेढे घेतले. परंतु, नंतर पोलिसांना जुल्फिकार अली भुट्टो याच्याविरुद्ध केस दाखल करावी लागली होती.

पाकिस्तानात जनरल झिया उल हक याने उठाव करून लष्करी राजवट आणल्यानंतर झियाने जुल्फिकार अली भुट्टो याच्या विरोधातल्या या खटल्याचा चलाखीने वापर करून घेतला. जुल्फिकार अली भुट्टो नावाचा “राजकीय काटा” लष्करी राजवटीच्या मार्गातून दूर केला होता. त्याच पद्धतीने शेख हसीना यांचा काटा काढायचा मोहम्मद युनूस याचा बेत आहे.

मोहम्मद युनूसच्या सरकारने शेख हसीना यांच्या विरुद्ध विद्यार्थी आंदोलन दडपल्याचा आणि विद्यार्थ्यांची सामूहिक हत्या केल्याचा आरोप केला आहे. युनूस सरकारने याच खटल्यात शेख हसीनांच्या पाच माजी सहकाऱ्यांना देखील गोवले आहे. आंतरराष्ट्रीय लवाद त्यांच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. बांगलादेशी कायद्यातली कठोरातील कठोर कलमे त्यांच्या विरोधात लावून शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी व्यूहरचना मोहम्मद युनूस यांच्या सरकारने केली आहे.

Mohammed Younis trying to execute Sheikh Hasina like Zulfikar Ali Bhutto

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात