विशेष प्रतिनिधी
पुणे : बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी यांनी सत्ता हस्तगत केली. त्यामागे अमेरिका आणि चीन यांच्या शक्ती कशा लागल्या, याच्या कहाण्या सर्व जगभर पसरल्या. पण बांगलादेशातल्या इस्लामी कट्टरपंथीयांनी सरकारचा चेहरा म्हणून नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांना निवडले. प्रत्यक्षात सत्ता जमाते इस्लामी आणि इतर कट्टर पंख्यांच्या हातात गेली. पण मोहम्मद युनूस यांचा उदारमतवादी चेहरा सरकारला लाभल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोहम्मद युनूस यांना सेक्युलर सर्टिफिकेट देऊन टाकले. Pawar’s secular certificate to Mohammad Yunus
मोहम्मद युनूस सेक्युलर आहेत. ते बांगलादेशातली परिस्थिती सुधारतील, असा निर्वाळा शरद पवार यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिला. शरद पवार आणि मोहम्मद युनूस दोघांची पार्श्वभूमी ग्रामीण आहे. शरद पवारांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहेत. मोहम्मद युनूस यांनी ग्रामीण बँकेमार्फत बांगलादेशात आर्थिक क्रांती घडवली वगैरे एकमेकांशी संबंध माध्यमांनी जोडले आणि त्यावरच पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी पवारांनी मोहम्मद युनूस यांना ते सेक्युलर असल्याचे सर्टिफिकेट देऊन टाकले.
Siddheshwarnath temple : बिहारच्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविकांचा मृत्यू; 12 हून अधिक जखमी; पायऱ्या चढताना दुर्घटना
परंतु प्रत्यक्षात मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातल्या हिंसाचारामध्ये हिंदूंना टार्गेट केल्यानंतर ते पॅरिस मध्ये असताना त्याबद्दल चकार शब्द काढला नव्हता. आता सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर आणि हिंदूंवरच्या हल्ल्यांनी आणि अत्याचाराने कळस गाठल्यानंतर सगळ्या जगात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशी हिंदू युवकांची चर्चा करायची तयारी दाखविली, पण याच मोहम्मद युनूस यांनी आपल्या मंत्रिमंडळात अशा 4 कट्टर पंथीयांना स्थान दिले ज्यांच्यावर हिंदू विरुद्ध हिंसा भडकवण्याचे आरोप आहेत.
मोहम्मद युनूस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी हिफाजत ए इस्लामचा म्होरक्या एफ. एम. खालिद हुसेन याला स्थान दिले. त्याने बांगलादेशातल्या हिंसाचाराला चिथावणी दिली. बांगलादेशातल्या 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले घडविले. त्या खालिद हुसेनला मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशी हंगामी मंत्रिमंडळातले धार्मिक मामल्यांचे खाते सोपविले आहे. रिटायर्ड ब्रिगेडियर सखावत हुसेन यांच्याकडे गृह मंत्रालय दिले आहे. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना भडकावणारा कायद्याचा प्रोफेसर असिफ नजरूल याला देखील मोहम्मद युनूस यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.
या सगळ्यांवर हिंदू विरोधात हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहेच, पण त्याचबरोबर हे बांगलादेशातल्या इस्लामी कट्टरपंथी संघटनांशी संबंधित असणारे म्होरके आहेत. हे सगळे आता मोहम्मद युनूस यांच्या मंत्रिमंडळात राहून बांगलादेश सरकारचे संचालन करत आहेत, तरी देखील मोहम्मद युनूस यांना शरद पवारांनी ते सेक्युलर असल्याचे सर्टिफिकेट देऊन टाकले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App