Modi In Action : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील १००००० कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. मोदी यांनी महाराष्ट्रातील एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे 38 प्रकल्प मार्गी लावण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पांना गेली 20 वर्षे विलंब झाला आहे. 20 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पांचा खर्च 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. यातील दोन प्रकल्पांचा खर्च तर तब्बल 500 टक्क्यांनी वाढला आहे. Modi In Action: Projects worth Rs 100,000 crore to be completed in Maharashtra before Lok Sabha elections!!



– पंतप्रधानांचे टार्गेट

महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते, शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे 20 वर्षांपासून प्रलंबित असलेले 38 मोठे प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीच या प्रकल्पांना पूर्ण करण्याचे उद्धिष्ट मोदी यांनी ठेवले आहे. हे लक्ष्य केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून, देशातील सर्व राज्यांसाठी आहे.

– महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प

रेल्वे : 14, मूळ किंमत- 18 हजार 567 कोटी, अंदाजित खर्च -32 हजार 949 कोटी

कोळसा : 5, मूळ किंमत 1 हजार 801 कोटी, अंदाजित खर्च 2 हजार 113 कोटी

पेट्रोलियम : 5, मूळ किंमत 11 हजार 287 कोटी, अंदाजित खर्च 13 हजार 529 कोटी

शहरी विकास : (मेट्रो) 1, मूळ किंमत- 23 हजार 136 कोटी, अंदाजित खर्च- 33 हजार 406 कोटी

महामार्ग : 13, मूळ किंमत 8 हजार 966 कोटी, 9 हजार 806 कोटी

Modi In Action: Projects worth Rs 100,000 crore to be completed in Maharashtra before Lok Sabha elections !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात