2 – 0 आघाडी : फुटबॉलच्या परिभाषेत पंतप्रधान मोदींनी कोल्हापूरकरांना समजावला विजयाचा फॉर्म्युला!!

Modi explained the formula of victory to the people of Kolhapur in the terminology of football

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतले पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. या दोन टप्प्यांमध्ये मतदानाची आकडेवारी पाहिली, तर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी 2 – 0 अशी आघाडीवर आहे, अशा फुटबॉलच्या परिभाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरकरांना आपल्या विजयाचा फॉर्म्युला समजावून सांगितला. Modi explained the formula of victory to the people of Kolhapur in the terminology of football

कोल्हापुरामध्ये फुटबॉल अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कोल्हापूरचे हजारो युवक फुटबॉल खेळतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवतात, याचा संदर्भ घेऊनच पंतप्रधान मोदींनी कोल्हापूरकरांच्या काळजाला हात घालत फुटबॉलच्या परिभाषेत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजयी फॉर्म्युला सांगितला. लोकसभा निवडणुकीतले पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी 2 – 0 अशी आघाडीवर आहे. विरोधकांची इंडिया आघाडी आत्ताच पिछाडीवर ढकलली गेली आहे, असे मोदी म्हणाले.

आपल्या अख्ख्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधी उमेदवारचे म्हणजेच शाहू महाराजांचे नाव देखील घेतले नाही. उलट त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना वंदन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली.

अब की बार ओबीसी सरकार, अब की बार आदिवासी सरकार, अब की बार पिछडी सरकार अशा वेगवेगळ्या घोषणा मोदींनी आपल्या भाषणा दरम्यान जनतेकडून वदवून घेतल्या. काँग्रेस या देशातल्या महिलांचे मंगळसूत्र देखील हिरावून घ्यायला चालली आहे. देशात वारसा हक्क कायदा लागू करून तिच्या संपत्तीची लूट करून तिचे वाटप घुसखोरांना करणार आहे, असा परत एकदा इशारा मोदींनी आपल्या भाषणात दिला. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर मधून 370 कलम पाठविले पण काँग्रेस मात्र ते कलम पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये लागू करून तिथे भेदभाव निर्माण करणारा असल्याचा दावाही मोदींनी केला.

या सगळ्या सभेचा टोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी विरुद्ध राहुल गांधी असाच ठेवला. कोल्हापूर मधली लढाई काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक अशी नाही. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले. “मान देऊन गादीला मत देऊ मोदीला”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या जनतेकडून करवून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांचे नावही घेतले नाही.

Modi explained the formula of victory to the people of Kolhapur in the terminology of football

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात