Modi challenge ठाकरे + पवार + राहुलना मोदींचे आव्हान शाहांकडून रिपीट; सावरकर + बाळासाहेबांची करून दाखवा स्तुती!!

Modi challenge

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे + पवार + राहुलना मोदींचे आव्हान अमित शाहांकडून रिपीट, सावरकर + बाळासाहेबांची करून दाखवा स्तुती!!, असे आज मुंबईत घडले. Modi’s challenge to Thackeray + Pawar + Rahul repeated by Shah

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आव्हान दिले होते, की तुम्ही राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करवून दाखवा. अमित शाह यांनी आज मुंबई येऊन पुन्हा तेच आव्हान दिले.

भाजप संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी केवळ दोन शब्द चांगले बोलू शकतील का?? बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगले शब्द बोलेल का??, उद्धवजी, तुमच्यात हिंमत असेल, तर हे घडवून दाखवा, असे आव्हान अमित शाह यांनी दिले.

अमित शाह म्हणाले :

उद्धवजी तुम्ही कोणासोबत बसला आहात??, जी लोक कलम ३७० ला विरोध करत आहे, जी लोक राम मंदिरास विरोध करतात, जी लोक सावकरसंदर्भात चांगले बोलू शकत नाहीत. संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा!!

महाराष्ट्र अनेक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहे. महायुती सरकारने महिला, शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. मजबूत, समृद्ध आणि सुस्कृंत महाराष्ट्रासाठी संकल्पपत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या राज्यघटनेनुसार काश्मीरमध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते.


Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला


गरीबांचे कल्याण, महिलांचा सन्मान

ज्या संकल्पपत्राचं लोकार्पण झाले ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचे नेतृत्व करत आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचे आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली.

आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान, गरीबांचे कल्याण करण्याचे म्हटले आहे. आम्ही महिलांचा सन्मान करण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला जनादेश दिला. नंतर २०१९मध्ये आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत. आघाडीत अंतर्गत मतभेद आहेत. आमच्या संकल्पपत्रात मजबूत महाराष्ट्र कसा होईल हे पाहिलं आहे. निवडणुकीत आमचा मुकाबला आघाडीशी आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांना विचारधारेशी घेणेदेणे नाही.

शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी कित्येक किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नॅरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे.

BJP resolution letter for Maharashtra announced

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात