Modi calls Israeli PM Netanyahu : मोदींचा इस्रायली PM नेतन्याहूंना फोन; तणाव कमी करण्यासह ओलीसांची सुटका आणि युद्धविरामावर चर्चा

Modi calls Israeli PM Netanyahu

वृत्तसंस्था

तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी (16 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. X वरील पोस्टद्वारे मोदींनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की नेतन्याहू यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. Modi calls Israeli PM Netanyahu

दोन्ही पंतप्रधानांमध्ये पश्चिम आशियातील तणावावरही चर्चा झाली. मोदींनी इस्रायलच्या पंतप्रधानांना हमाससोबतचे युद्ध वाटाघाटी आणि मुत्सद्देगिरीने संपवण्यास सांगितले. त्यांनी सर्व ओलीसांची तात्काळ सुटका आणि युद्धबंदीचा आग्रह धरला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गाझामधील मानवतावादी संकटाचा सामना करणाऱ्या लोकांना मदत पुरवली जावी. याशिवाय भारत आणि इस्रायलमधील संबंध दृढ करण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

इस्रायल आणि हमास यांच्यात 11 महिने युद्ध सुरू आहे

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला जवळपास 11 महिने उलटले आहेत. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवले होते.


मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यनंतर रामगिरी महाराजांविरोधात 5 गुन्हे दाखल; संभाजीनगर-नगरमध्ये जमाव आक्रमक


इस्रायलच्या म्हणण्यानुसार 111 लोक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. यामध्ये ३९ मृतदेहांचाही समावेश आहे. ओलिसांमध्ये 15 महिला आणि 5 वर्षाखालील 2 मुलांचा समावेश आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. या युद्धात आतापर्यंत ३२९ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत 15 हजारांहून अधिक हमास दहशतवाद्यांना ठार केले आहे. युद्धामुळे गाझामधील सुमारे 18 लाख लोकांनी आपली घरे सोडली आहेत. इस्रायल आणि दक्षिण लेबनॉनमधील हजारो लोकांनाही आपली घरे सोडावी लागली.

5 लाख लोकांना उपासमारीचे संकट

युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. इस्रायलच्या हल्ल्याचा फटका बसणाऱ्या गाझातील नागरिकांसमोर उपासमारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एका अहवालानुसार गाझामधील सुमारे 5 लाख लोकांना येत्या काही महिन्यांत अन्न संकटाचा सामना करावा लागणार आहे. हा आकडा गाझाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे.

वृत्तानुसार, इस्रायली हल्ल्यांनी गाझामधील 59% इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत. उत्तर गाझा मध्ये ही संख्या 70% पेक्षा जास्त आहे.

Modi calls Israeli PM Netanyahu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात