Sharad Pawar : बांगलादेशात जिहादी सत्ता, हिंदूंवर अत्याचार; पवार म्हणाले, महाराष्ट्रात नकोत त्याचे पडसाद!!


विशेष प्रतिनिधी

नागपूर : बांगलादेशात लोकशाहीवादी सत्ताधाऱ्यांना हाकलून देऊन प्रस्थापित झाली जिहादी सत्ता, हिंदू समाजावर झाले अत्याचार, पण शरद पवारांना मात्र नकोत त्याचे महाराष्ट्रात पडसाद!!

बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी, हिफाजत ए इस्लाम आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या म्होरक्यांनी सत्ता हस्तगत केली. सत्तांतर होताना तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार केले. हजारो हिंदूंची घरे, मंदिरे पेटवली. शेकडो हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले. हिंदू समाज संतप्त झाला. लाखांच्या संख्येने ढाक्याच्या रस्त्यावर उतरला. जगभरातले हिंदू संतापले.

भारतात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्रात नाशिक, संभाजीनगर, धुळे यासह काही ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. पण यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार Sharad Pawar पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली. बांगलादेशमधल्या जिहादी सत्तांतराला ते “विद्यार्थी उठाव” म्हणाले. तिथल्या हिंदूंवरच्या अत्याचाराला ते “घडणाऱ्या घडामोडी” म्हणाले. वर त्या घडामोडींचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ देऊ नका, अशी उपदेशी भाषा त्यांनी वापरली.

शरद पवार म्हणाले :

बांगलादेशमध्ये सत्तांतर झाले. यासाठी तरुण पिढीने उठाव केला होता. त्यातून काही गोष्टी घडल्या. पण दुर्दैवाने त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटली. प्रामुख्याने बांगलादेशच्या सीमेवरील पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात परिस्थिती अधिक गंभीर होती. पण तिथे काही घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असे कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तींनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढेच मी सांगू इच्छितो.

शासनाचे धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचे जास्त महत्त्व वाटते. म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल, याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल, असे काही करू नये हे माझे आवाहन आहे.

Sharad pawar says, dont let the bangladesh crisis affect on maharashtra!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात