विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी म्हणाले मोदी आणि केजरीवाल खोटं बोलण्यात सारखेच, याचा अर्थ INDI आघाडीत 50 % खोटे भरलेत!!
राहुल गांधींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सीलमपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली. या पहिल्याच शुभेच्छांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. मोदी आणि केजरीवाल हे दोघेही खोटे बोलण्यात सारखेच आहेत, असा आरोप त्यांनी केला. दोघेही अदानी यांच्या विरोधात काही बोलत नाहीत. सगळा देश अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांच्यासारखे उद्योगपती विकत घेताहेत, पण मोदी आणि केजरीवाल त्यांच्या विरोधात आवाज उठवत नाहीत. विकासाच्या खोट्या बाता ते मारतात, असे राहुल गांधी म्हणाले.
केजरीवालांनी सांगितले होते, देशातल्या भ्रष्टाचार मिटवू. दिल्ली स्वच्छ करू. दिल्लीचे पॅरिस करू. दिल्लीकरांनो तुम्हीच सांगा, केजरीवालांनी हे सगळे केले का??, केले नसेल तर केजरीवाल खोटं बोलले जसं मोदी खोटं बोलतात असेच म्हणावे लागेल ना??, असा खोचक सवाल राहुल गांधींनी केला.
आपल्या सगळ्या भाषणातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे INDI आघाडीत 50 % खोटे लोक भरलेत याचीच कबुली दिली. कारण काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवताना एकमेकांवर खोटेपणाचे आरोप करत आहेत. पण मोदी सरकारच्या विरोधात मात्र INDI आघाडीत एकत्र येऊन लढायच्या बाता करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App