विशेष प्रतिनिधी
इंफाळ : एकेकाळचा उग्रवादी आणि जहालमतवादी चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू याचा एन्काऊंन्टर बेकायदेशीर पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप करत खुद्द गृहमंत्री लहकमन रिंबुई यांनी आपला राजीनामा सोपवलाय. ५४ वर्षीय थांगख्यू हा बंदी घालण्यात आलेल्या ‘हाइनिवट्रेप नॅशनल लिबरेशन काउंसिल’ या संघटनेचा माजी महासचिव होता. Meghalaya Home Minister resigns over alleged illegal encounter with terrorists
चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू यानं २०१८ मध्ये उपमुख्यमंत्री प्रेस्टोन त्यसोंग आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. मात्र, मेघालयात झालेल्या आयईडी स्फोटाचा मास्टरमाईंड तो स्वत:च असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
मेघालय पोलिसांची एक टीम आयईडी स्फोट प्रकरणात छापेमारीसाठी थांगख्यू याच्या मवलाई भागातील ‘किनटोन मसार’ निवासस्थानी दाखल झाली होती. याच दरम्यान थांगख्यू यांचं एन्काऊन्टर करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, थांगख्यू याने छापेमारी दरम्यान पोलिसांच्या चार जणांच्या टीमवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात थांगख्यू याचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबारानंतर थांगख्यू याला नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आलं परंतु, इथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या इतर दोन साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. ९ एमएम बंदूक, एक चाकू, लॅपटॉप आणि अनेक मोबाईलही जप्त करण्यात आलेत. मात्र, थांगख्यू यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App