विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वत्र सभा घेणार असतील, तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन दुसºया दिवशी त्यांची पोलखोल करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. we will hold meetings whereever Ncp organise, Chandrakant Patil’s warning
पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. खोटं बोल पण रेटून बोलह् अशी पवार यांची प्रवृत्ती आहे.
शरद पवार यांनी मराठा आरक्षण बाबत सर्वत्र फिरून जनजागृती केली जाईल. घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला गेला. आरक्षणासाठी सरकारने पाऊल टाकले असा लोकांचा गैरसमज झाला. पण ही ओबीसींची फसवणूक आहे, अशी टीका केली होती. यावर पाटील यांनी पवार यांच्यावर हल्लबोल केला. ते म्हणाले, केंद्र आणि राज्यात सत्तेवर असताना जे मराठा आणि ओबीसींच राजकीय आरक्षणाबाबत काहीही करू शकले नाहीत. ते आता आपल्या चुकांचं खापर आमच्यावर फोडत आहेत.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत राज्यातील ५ प्रमुख पक्षाच्या ५ प्रमुख नेत्यांना एकाच ठिकाणी येऊन याबाबतीत खुलासा करावा. याचे थेट प्रक्षेपण सर्व माध्यमावरून करावे. असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
पाटील म्हणाले की, आरक्षणाची मर्यादा ५० टक्यांच्या वर वाढवायला हवी, असे शरद पवार म्हणतात. पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, गायकवाड आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला असल्याने जोपर्यंत मराठा समाज मागास असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा परिपूर्ण अहवाल राज्य सरकार मिळवत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही.
असा अहवाल नसेल तर आरक्षणाची मयार्दा ५० टक्यांपेक्षा जास्त करूनही मराठा समाजाला त्याचा काही उपयोग नाही. मराठा समाजासाठी नव्याने असा अहवाल घ्यावा लागेल, असे महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या न्या. भोसले समितीनेही म्हटले आहे. तथापि, आघाडी सरकार त्यासाठी काहीही हालचाल करत नाही. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेसाठीही पुढाकार घेत नाही. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविण्यात या सरकारला पूर्ण अपयश आले. आपले हे अपयश लपविण्यासाठी खोटे सांगितले जात आहे.
आरक्षणासाठीची ५० टक्यांची मयार्दा हटविण्यासाठी यापूर्वी केंद्रात आणि राज्यात दीर्घकाळ सत्ता असताना शरद पवार यांनी का प्रयत्न केले नाहीत? २००५ साली नचिअप्पन कमिटीने तशी शिफारस केली होती तरीही त्यावेळी केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवार यांनी २०१४ पर्यंत त्यासाठी काही का केले नाही?, हे सांगितले पाहिजे, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App