विशेष प्रतिनिधी
पाटणा : वैद्यकीय माफियांचा पोलखोल करणाऱ्या पत्रकाराची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे. पत्रकार तथा आरटीआय कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला असून, वैद्यकीय माफियांनी त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.Medical mafia killed journalist after abduction in Bihar
बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात ही घटना घडली. त्याने काही बनावट रुग्णालयांचा पदार्फाश केला होता.बुद्धीनाथ झा असे या पत्रकाराचे नाव आहे. तो स्थानिक न्यूज पोर्टलसाठी काम करायचा. त्याने काही बनावट रुग्णालयांचा पदार्फाश केला होता. त्यानंतर अशा रुग्णालयाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती.
या रुग्णालयांच्या नावांसह एक फेसबुक पोस्टदेखील त्याने लिहिली होती. त्याच्या दोन दिवसानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. घटनेचे वार्तांकन करताना देखील बुद्धीनाथला अनेक धमक्या येत होत्या. त्याला लाखो रुपयांचे आमिष दाखवले गेले.
त्याच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तो अखेरचा दिसला होता. रात्री नऊच्या सुमारास तो त्याच्या घरातून निघाला. रात्री दहाच्या सुमारास एकाने स्थानिक बाजारपेठेत त्याला पाहिले. त्यानंतर तो गायब झाला. तो न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
शुक्रवारी बुद्धीनाथचा चुलत भाऊ विकासला बेतौनजवळील महामार्गावर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. बोटातील अंगठी आणि गळ्यातील सोन्याच्या चेनवरून त्याची ओळख पटविण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App