योगींचा मास्टर स्ट्रोक; दिवाळीपासून होळीपर्यंत उत्तर प्रदेशात गरीबांना मोफत धान्य!!


वृत्तसंस्था

बदायू : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमकपणे विविध योजना जाहीर करताना दिसत आहेत. आज बदायू मध्ये त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात दिवाळी ते होळी या कालावधीत गरीबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. Yogi’s master stroke; Free food to the poor in Uttar Pradesh from Diwali to Holi !!



दिवाळी पर्यंत केंद्र सरकारने गरीबांना मोफत धान्य दिले. आता राज्य सरकार होळीपर्यंत गरिबांना प्रत्येक कुटुंबाला 35 किलो एवढे मोफत धान्य देईल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. बदायू मधल्या विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. पूर्वंचाल मध्ये उत्तर प्रदेश सरकारने सगळ्या प्रकारच्या माफियांचा सफाया केला आहे. भू माफिया, ड्रग्स माफिया, लव जिहाद माफिया हे सगळे आज जेलमध्ये आहेत. त्यामुळे सरकारच्या योजना गरिबातल्या गरीबपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे, याची आठवण योगी आदित्यनाथ यांनी करून दिली.

राज्यातले विरोधक एकमेकांशी गठजोड करतात आणि मोडतात भाजपची मात्र जनतेशी गठजोड मजबूत आहे, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आदींची खिल्ली उडवली. मोफत धान्य योजनेचे विस्तारीकरण करून त्यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीपूर्वी मास्टर स्ट्रोक मारला.

Yogi’s master stroke; Free food to the poor in Uttar Pradesh from Diwali to Holi !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात