Md Yunus : कोण होतास तू, काय झालास तू??; “Hindu Killer”, “Father of terrorists”

Md Yunus

Md Yunus  बांगलादेशात ग्रामीण बँकेद्वारे आर्थिक क्रांती घडविल्याबद्दल 2006 चा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या मोहम्मद युनूस यांना त्यावेळी वाटले देखील नसेल की, पाश्चात्य जगतामध्ये विशेषतः व्यक्ती स्वातंत्र्याचा धोषा लावणाऱ्या अमेरिकेमध्ये आपल्याला 30 वर्षानंतर म्हणजे 2024 मध्ये आपल्याच बांगलादेशी नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागून Hindu Killer आणि “Father of terrorists” या शिव्या खाव्या लागतील!! Killer of Hindus slogans against Md Yunus in New York over attacks on minorities in Bangladesh

पण हे न्यूयॉर्कमध्ये 24 सप्टेंबर 2024 रोजी खरंच घडले. ज्या मोहम्मद युनूस यांना अमेरिकेसह पाश्चात्य जगताने बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे बँकेद्वारे आर्थिक क्रांतीचे जनक म्हणून डोक्यावर घेतले होते, ज्यांचा नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता, त्याच मोहम्मद युनूस यांना “हिंदूंचा मारेकरी” आणि दहशतवाद्यांचा बाप या शिव्या बसल्याचे अमेरिकन नागरिकांना देखील पाहावे लागले.

याचे कारण खरे तर खुद्द मोहम्मद युनूस यांच्या वैयक्तिक राजकीय कर्तृत्वातच आहे. विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशात ज्यावेळी इस्लामी जिहादींनी सत्ता बळकावली, त्यावेळी मोहम्मद युनूस यांनी स्वतःचा चेहरा त्या सरकारला मुखवटा म्हणून वापरू दिला. त्यातून बांगलादेशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळेल, असे मोहम्मद युनूस आणि इस्लामी जिहादींना वाटले. आपण नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ आहोत. त्यामुळे पाश्चात्य जगतामध्ये आपण आपला वाटेल तसा नॅरेटिव्ह सेट करू शकतो, असा अहंकार मोहम्मद युनूस आणि इस्लामी जिहादींना जरूर झाला असेल, परंतु बांगलादेशातल्या गेल्या दीड – दोन महिन्यातल्या घटनांनी मात्र मोहम्मद युनूस यांची ती तथाकथित “आंतरराष्ट्रीय उच्चभ्रू प्रतिमा” ढासळली आणि ती थेट “हिंदूंचा मारेकरी” आणि “दहशतवाद्यांचा बाप” शिव्यांच्या घोषणांच्य रूपात न्यूयॉर्कच्या रस्त्यावर आली. मोहम्मद युनूस यांचे हे “प्रतिमा परिवर्तन” बाकी कुणी घडवले नाही. ते त्यांच्या स्वतःच्या “राजकीय कर्तृत्वाने” घडले.

मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातल्या इस्लामी जिहादींना मोकाट सोडले. शेख हसीना बांगलादेशातून भारतात आल्यानंतर 800 इस्लामी जिहादींची मोहम्मद युनूस यांच्याच सरकारने तुरुंगातून सुटका केली. बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण घडताना ते मूकपणे पाहिले आणि होऊ दिले. इतर अल्पसंख्यांकांच्या मालमत्तांना देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडू दिले. भले मोहम्मद युनूस ढाकेश्वरी मंदिरात जाऊन हिंदूंशी काही बोलले असतील, त्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला असेल, पण प्रत्यक्षात त्यांच्या सरकारच्या धोरणात काही फरक पडला नाही. हिंदूंवरचे अत्याचार कमी झाले नाहीत. हिंदू आणि बाकीच्या अल्पसंख्यांकांना सरकारी नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यांच्या कोणाच्याही सुरक्षेत भर पडली नाही. उलट इस्लामी जिहादींचा माज वाढला. हे सगळे “नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ” मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत घडले.

दरम्यानच्या काळात मोहम्मद युनूस यांनी अमेरिकेकडून 17 अब्ज रुपयांची मदत मिळवली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जगतात आपली पत कायम आहे, असा आभास त्यांना बांगलादेशात निर्माण करत आला. पण या 17 अब्ज रुपयांमधले करोडो रुपये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज फेडण्यात किंबहुना त्या कर्जाचे व्याज देण्यातच जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भाषण देण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांना हजारो बांगलादेशींच्याच रोषाला सामोरे जावे लागले. न्यूयॉर्कमध्ये ते ज्या हॉटेलमध्ये उतरले, त्या हॉटेल समोर हजारो बांगलादेशींनी मोहम्मद युनूस यांच्या विरोधात निदर्शने केली. “हिंदूंचा मारेकरी” आणि “दहशतवाद्यांचा बाप परत जा”, अशा घोषणा दिल्या. मोहम्मद युनूस यांना भारतीय पत्रकारांनी काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना बाजूला केले. भारतीय पत्रकारांना सामोरे जाण्याचे टाळले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरची द्विपक्षीय औपचारिक भेट देखील टाळली. मोदी कदाचित हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल आपल्याला प्रश्न विचारतील आणि त्याची उत्तरे द्यावी लागतील या भीतीपोटी मोहम्मद युनूस मोदींना भेटलेच नाहीत.

एरवी त्यांनी ते कधीच केले नसते. कारण भारतातल्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पत्रकारांनी राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी मोहम्मद युनूस यांची तळी कायमच उचलून धरली होती. पण 2024 च्या अमेरिका दौऱ्यात मोहम्मद युनूस यांच्या बाबतीत सगळे उलटेच घडले. स्वतःच्याच राजकीय कर्तृत्वामुळे “कोण होतास तू, काय झालास तू??” असे म्हणायची वेळ मोहम्मद युनूस यांनी स्वतःवर आणली!!

Killer of Hindus slogans against Md Yunus in New York over attacks on minorities in Bangladesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात