भ्रष्टाचार प्रकरणात पुढील कारवाई होणार, गृह मंत्रालयाने दिली मंजुरी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Manish Sisodia दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर आम आदमी पक्षाला आता आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार आहेत.Manish Sisodia
भ्रष्टाचार प्रकरणात दोघांविरुद्ध पुढील कारवाईसाठी गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. दिल्लीच्या उपराज्यपाल कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालय विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम १७-अ अंतर्गत दिल्ली सरकारचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (शिक्षण) यांच्याविरुद्ध चौकशीसाठी गृह मंत्रालयाकडून मंजुरी मागितली होती.
त्याचप्रमाणे सत्येंद्र जैन (माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री) यांच्यावर पुढील कारवाईसाठी परवानगी मागण्यात आली. या प्रकरणात गृह मंत्रालयाने दोघांविरुद्ध पुढील कारवाईला परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App