लोकसभा अध्यक्ष निवडणूक लढवायला INDI आघाडी आली पुढे; पण ममतांनी चादर खेचताच संख्याबळात पडली मागे!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला काँग्रेस प्रणित INDI आघाडी सरसावली पुढे, पण ममतांनी चादर खेचतात संख्याबळात अधिकच पडली मागे!!
लोकसभा अध्यक्षपदाचे विरोधी पक्षांचे उमेदवार के. सुरेश यांच्या नामांकनाच्या प्रस्तावावर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सही केली नाही.Mamata banerji not to support INDI alliance candidate for loksabha speaker post



 

लोकसभेचे अध्यक्ष पदासाठी के सुरेश यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी सल्लामसरत केली नाही म्हणून ममता बॅनर्जी नाराज झाल्या त्याचा परिणाम तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सुरेश यांच्या अर्जावर सह्या न करण्यास झाला. राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत विधाने करण्यापूर्वी घटक पक्षांची चर्चाही केली नाही. काँग्रेसने एकतर्फी निर्णय घेऊन के. सुरेश यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली. हे ममता बॅनर्जींना पसंत पडले नाही. त्यामुळेINDI आघाडीचे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही संख्याबळ आणखी कमी झाले.

तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत 29 सदस्य आहेत आणि हा सभागृहात चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. सध्या लोकसभेत विरोधकांचे २३४ खासदार आहेत तर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांना 294 सदस्यांचा पाठिंबा आहे. निवडणुकीत टीएमसीची नाराजी दिसून आली, तर के. सुरेश यांना केवळ 205 मते मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने टीएमसीची मनधरणी करण्यासाठी बड्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली.

कोणत्या पक्षांच्या सह्या??

तृणमूल काँग्रेसचे 29 खासदार के. सुरेश नामांकनात प्रस्तावक बनले नाहीत. पण INDI आघाडीच्या वतीने काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि द्रमुकच्या खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Mamata banerji not to support INDI alliance candidate for loksabha speaker post

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात