सियाचीनच्या फॉरवर्ड पोस्टवर भारतीय लष्कराचा पहिलाच डेंटल चेक अप कॅम्प!!; नेमके महत्त्व काय??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजकीय धबडग्यांच्या रोजच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करासाठी अभिमानास्पद ठरावी अशी बातमी समोर आली. जगातली सर्वात उंच युद्धभूमी चीन आणि पाकिस्तान यांनी वेढलेला प्रदेश सियाचीन मधल्या भारतीय फॉरवर्ड पोस्टवर भारतीय लष्कराने आज पहिलाच डेंटल कॅम्प आयोजित केला. त्यामुळे भारतीय लष्कराच्या सेवा विभागाच्या मस्तकी मानाचा तुरा खोवला गेला.Indian Army’s First Dental Check Up Camp at Forward Post of Siachen!!; What exactly is the significance??



भारतीय लष्कराच्या विविध उपक्रमांमध्ये जवानांचे हेल्थ चेकअप हा सर्वसामान्य विषय आहे. परंतु सियाचीन सारख्या 12 महिने बर्फाने वेढलेल्या प्रदेशात जवानांसाठी हेल्थ काम घेणे ही गोष्ट फार अवघड होती. सियाचीन मधल्या फॉरवर्ड पोस्टवर जिथे पोहोचायलाच मुळात जवानांना तीन तीन – चार चार दिवस लागतात, सुरुवातीच्या काळात तिथे कोणत्याही सोयीच नव्हत्या. अगदी 2014 पर्यंत सियाचीन मधल्या फॉरवर्ड पोस्ट कडे सरकारचे दुर्लक्ष असायचे अत्यंत दुर्गम भागात आणि उंचावर हेलिकॉप्टर आणि विमान सेवा देखील अवघड असायची.

परंतु 2014 नंतर परिस्थिती बदलली जवानांच्या सोयीसाठी आणि सुविधांसाठी सरकारने नियमित हेलिकॉप्टर आणि विमानसेवा सुरू केली. फॉरवर्ड पोस्टवर आवश्यक असलेल्या सर्व लष्करी सुविधा तसेच अन्य वैद्यकीय सुविधा ही पुरवायला सुरुवात केली. याचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून सियाचीन मधल्या सर्वोच्च फॉरवर्ड पोस्टवर लष्कराने डेंटल हेल्थ चेक कॅम्प आयोजित केला.

सियाचीन संपूर्ण बर्फाळ प्रदेश पाकिस्तान आणि चीन यांच्या सीमांनी वेढला आहे. पाकिस्तान आणि चीन ज्या पद्धतीने परस्पर सहकार्य करून आपापल्या सीमांचे रक्षण करतात, या पार्श्वभूमीवर भारताची तिथली संरक्षण व्यवस्था सुरुवातीच्या काळात ढिल्ली होती. मात्र ती आता सुधारून ती अधिक सक्षम करण्याकडे सरकारने लक्ष पुरविले आहे. जवानांच्या हेल्थ चेक अप कॅम्प हे त्याचेच एक द्योतक ठरले.

Indian Army’s First Dental Check Up Camp at Forward Post of Siachen!!; What exactly is the significance??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात