विशेष प्रतिनिधी
कोलकाता: उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी कॉँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी या ज्येष्ठ विधिज्ञांवरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भरवसा असल्याने राज्याचे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) किशोर दत्ता यांनी राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या मनमानीला कंटाळून राजीनामा देणारे दत्ता हे चौथे महाधिवक्ता आहेत.Mamata Banerjee relies on Congress MPs, Advocate General resigns
दत्ता यांनी राज्यपाल जगदीप धनकडे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारण म्हटले असले तरी त्यांना गेल्या वर्षभरापासून सातत्याने महत्वाच्या खटल्यांपासून बाजुला ठेवण्यात येत होते. त्यांना कायदेशिर प्रक्रियेत स्थान देण्यात येत नव्हते. राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या खटल्यांमध्ये अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांची नियुक्ती केली जात होती.
पश्चिम बंगालमधील मतदानानंतरच्या हिंसाचाराच्या संदर्भातील खटल्यात या दोघांनीच बाजू मांडलीहोती. त्याचबरोबर शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केल्यानंतर कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचे वकील म्हणून मुख्यमंत्र्यांनी सिंघवी यांना नियुक्त केले होते.
फेब्रुवारी २०१७ मध्ये दत्ता यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वर्षी मे महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर दत्ता यांना पुन्हा नॉमिनेट करण्यता आले नव्हते. पश्चिम बंगालचे कायदा मंत्री मोलोय घटक यांच्या मते, दत्ता यांना पुन्हा नॉमिनेट करण्यात आले नाही हे राजीनाम्यामागील कारण असू शकते. कोणाला नॉमिनेय करायचे याचा अधिकार पूर्णपणे सरकारचा आहे. यामागे अनेक घटक असतात असेही त्यांनी सांगितले होते.
राजकीय हिंसा प्रकरणात बंगाल सरकारचा बचाव करण्यात आणि ममता बॅनर्जींच्या नंदीग्राम निकाल प्रकरणासाठी अनुकूल आदेश आणण्यात दत्ता अपयशी ठरले. कलकत्ता उच्च न्यायालयाने राजकीय हिंसा प्रकरणाच्या सीबीआय तपासाचे आदेश दिले आणि राज्य सरकारला पीडितांना भरपाई देण्याचे निर्देश दिले.
राज्याला हा मोठा धक्का होता. बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात खटलाही सरकार हरले होते. त्यामुळे ममता बॅनर्जी रागावल्या होत्या असेही सांगितले जाते.सलग राजीनामा देणारे दत्ता हे चौथ महाधिवक्ता आहेत. यापूर्वी बिमल चॅटर्जी, अनिंद्य मित्रा आणि जयंता मित्रा यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App