विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना बंगाल बाहेर पडायची नाही इच्छा, पण तरी विरोधकांच्या अख्ख्या Indi आघाडीचे नेतृत्व करायची त्यांनी धरलीय महत्त्वाकांक्षा!! Mamata banerjee has no desire to leave Bengal
स्वतः ममता बॅनर्जी यांनीच एका मुलाखतीत ही इच्छा बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीनंतर Indi आघाडीत थोडीफार जान आली होती, पण हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर ती जान निघून गेली. कारण दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला. किंबहुना दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस जोरदार आपटली. त्यामुळे काँग्रेसकडे Indi आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता उरली नाही, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
त्याच वेळी ममता बॅनर्जी यांनी आपणच Indi आघाडीची स्थापना केली आहे, सध्या जे त्या आघाडीचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी ते सोडून दिले, तर त्या आघाडीचे नेतृत्व करायची आपली तयारी आहे, असे सांगितले. पण हे नेतृत्व करण्यासाठी आपण बंगाल बाहेर पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. Indi आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी बंगाल सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. आपण बंगालमध्येच मुख्यमंत्रीपद सांभाळून Indi आघाडीचे नेतृत्व करू शकतो, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
याबाबतीत ममता बॅनर्जी यांचे पुरते “शरद पवार” झाले. कारण पवारांना देखील राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायची मोठी हौस असताना महाराष्ट्र मात्र सोडून बाहेर पडायची त्यांनी कधी तयारी दाखवली नाही.
पवारांनी सगळे “डाव” टाकले, ते महाराष्ट्रातच, त्यातही पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर + सातारा वगैरे जिल्ह्यांमध्येच. पवारांनी कधी महाराष्ट्र बाहेर पडून लखनऊ, चेन्नई, पाटणा, भुवनेश्वर, कोलकाता, जयपूर वगैरे ठिकाणी जाऊन डाव टाकल्याची उदाहरणे त्यांच्या 60 वर्षांच्या राजकीय आयुष्यात आढळली नाहीत. पवारांनी एकदाच मुंबईतून दिल्लीत जाऊन “डाव” टाकायचा प्रयत्न केला, तो अडीच वर्षात त्यांच्या अंगलट आला आणि त्यांना महाराष्ट्रात परतावे लागले.
ममता बॅनर्जींना सुद्धा असाच राष्ट्रीय पातळीवर “डाव” टाकून बघायचा आहे. त्यासाठी त्यांना Indi आघाडीचे नेतृत्व देखील करायचे आहे, पण शरद पवारांसारखेच त्यांना त्यांच्या राज्यातून बाहेर न पडता हे सगळे “डाव” साध्य करून घ्यायचे आहेत, मग त्यामध्ये त्यांना यश येईल की नाही, हे पवारांनी टाकलेल्या डावांच्या दुर्बिणीतून स्पष्ट पाहता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App