विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेमध्ये संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेता बसू शकेल एवढे सुद्धा विरोधी आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले नाहीत, तरी देखील काँग्रेस + ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज आमदारकीच्या शपथविधीवर विधिमंडळात बहिष्कार घालून ते सदनाबाहेर पडले. पण अशी शपथ न घेऊन हे निवडून आलेले आमदार पुढे करणार तरी काय??, असा सवाल या निमित्ताने तयार झाला. Opposition boycotts MLA oath-taking ceremony today
महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार निवडून आलेत त्यांच्या शपथविधीसाठी आजपासून मुंबईत विधिमंडळात अधिवेशन सुरू झाले हंगामी सभापती कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांना शपथ दिली.
पण विरोधी पक्षांनी मात्र या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालून सभात्याग केला. ईव्हीएम मुळे राक्षसी बहुमताने सत्तारूढ झाले. जनतेचा या सरकारविरुद्ध आक्रोश आहे आम्ही जरी ईव्हीएम वर निवडून आलो असतो तरी जनमताचा एकूण कौल बघता आम्ही शपथ घ्यायची की नाही हे नंतर ठरवू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि 16 आमदारांचे नेते नाना पटोले म्हणाले.
त्यावर सगळ्या आमदारांना शपथ घ्यावीच लागेल. आज नाहीतर उद्या शपथ घेतील, अन्यथा त्यांना कामकाजात भागच घेता येणार नाही, असे अजित पवारांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी त्यांना दुजोरा दिला.
– आमदार निधीवर पाणी सोडतील का??
वास्तविक नियमानुसार कुठल्याही आमदाराला शपथ घ्यावीच लागेल. त्याशिवाय त्याची आमदारकी अधिकृत ग्राह्य धरताच येणार नाही. समजा विधिमंडळात त्यांनी शपथ घेतली नाही, तर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना शपथ घ्यावी लागेल. जोपर्यंत कुठलाही आमदार शपथ घेत नाही, तोपर्यंत त्याचे आमदारकीचे कुठलेही भत्ते, त्याचबरोबर आमदारकीचा कोट्यावधी रुपयांचा सरकारी निधी वगैरे देखील सुरू होत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी आज जरी आमदारकीच्या शपथविधी वर बहिष्कार घातला असला, तरी त्यांना विधिमंडळाच्या नियमानुसार शपथ घ्यावीच लागेल. अन्यथा त्यांना कामकाजात भाग घेता येणार नाही, त्यांची आमदारकी अधिकृत मानता येणार नाही, त्याचबरोबर त्यांना आमदारकीचा निधी देखील मिळणार नाही. त्यामुळे उद्या विधिमंडळात किंवा नंतर अध्यक्षांच्या दारात सगळे विरोधी आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App