मसूद अझहरने भारताविरोधात केले विखारी वक्तव्य, म्हटले

Masood Azhar

बहावलपूरच्या मशिदीत त्यांनी समर्थकांमध्ये हे भाषण दिल्याचा दावा केला जात आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :Masood Azhar जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट असलेला दहशतवादी मसूद अझहरने पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वक्तव्ये केली आहेत. त्यांनी बाबरी मशिदीचाही उल्लेख केला. बहावलपूरच्या मशिदीत त्यांनी समर्थकांमध्ये हे भाषण दिल्याचा दावा केला जात आहे.Masood Azhar



मीडिया रिपोर्ट्सनुसार, अझहरने खिलाफत चळवळीला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1924 मध्ये तुर्कियेमध्ये भाषण दिले होते. हे भाषण 3 डिसेंबर रोजी जैशच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले होते. मसूदने भारत, पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात वक्तव्ये केली आहेत.

अझहर आपल्या भाषणात म्हणाला की, मोदींसारखा दुबळा माणूस आपल्याला आव्हान देत आहे. नेतान्याहूसारखा उंदीर आमच्या थडग्यावर नाचतोय. तुम्हीच मला सांगा, माझी बाबरी परत घेण्यासाठी 300 लोकही नाहीत का? अझहरने पुन्हा भारत आणि इस्रायलच्या विरोधात जिहादी मोहीम सुरू करून जगात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. त्यानी आपल्या भाषणात भारताविरुद्ध खूप विष काढले आहे.

Masood Azhar made a controversial statement against India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात