मालदीवचे डोके आले ठिकाणावर, भारतीय पर्यटक वाढण्यासाठी आता रोड शोची तयारी

Maldives now preparing for road show to increase the Indian tourists

वृत्तसंस्था

माले : मालदीवमध्ये या वर्षी सुरुवातीच्या तीन महिन्यांत गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भारतीय पर्यटकांची संख्या 34% घटली आहे. प्रामुख्याने पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या मालदीवसाठी हा खूप मोठा धक्का आहे. Maldives now preparing for road show to increase the Indian tourists

भारतविरोधी लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहंमद मुइज्जू यांच्या वृत्तीचे पडसाद आता मालदीवच्या पर्यटन उद्योगाला भोगावे लागत आहेत. लाचार मालदीव आता भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारताच्या विविध शहरांत रोड शो करण्याच्या तयारीत आहे.

मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्स (एमएटीएटीओ) हा रोड शो करणार आहे. एमएटीएटीओने भारतीय उच्चायुक्त मनु महावर यांच्याशी दोन्ही देशांतील प्रवास आणि पर्यटन सहकार्यास चालना देण्यावर चर्चा केली. भारत मालदीवसाठी महत्त्वाचे टूरिस्ट मार्केट आहे. म्हणून भारतीय पर्यटक घटल्याने मालदीव सरकार सध्या चिंतेत आहे.

2023 मध्ये होते दोन लाख पर्यटक

जानेवारीपासून मालदीवला येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या घटली आहे. याचे मोठे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मालदीवच्या काही नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयानुसार, जानेवारी-मार्च 2023 मध्ये 56 हजारांहून अधिक भारतीय मालदीवला आले होते. तर यावर्षी जानेवारी ते 10 एप्रिलपर्यंत केवळ 37 हजार भारतीय आले. 2023 मध्ये 2 लाख संख्या होती. यंदा भारत सहाव्या स्थानी आहे.​​​​​​​

Maldives now preparing for road show to increase the Indian tourists

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात