नाशिक : राज्यसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेला भाजप उद्या विधान परिषद निवडणुकीत जोमाने उतरत आहे. त्याला रोखण्याचे महाविकास आघाडी मधून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र दिल्लीत गेल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधान परिषद निवडणुकीची सूत्रे अजित पवारांकडे असल्याच्या मराठी माध्यमांच्या बातम्या आहेत. Maharashtra state council Elections : devendra Fadanavis and ajit Pawar lock horns, says marathi media
अर्थात या सर्व बातमी सूत्रांच्या हवाल्याने दिल्यामुळे त्याचा नेमका तथ्यांश किती हे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण माध्यमांनी स्वतःच विधान परिषद निवडणुकीत चाणक्य कोण ठरणार देवेंद्र फडणवीस की अजित पवार??, अशी झुंज लावून दिली आहे.
– काँग्रेसचा दुसरा उमेदवार धोक्यात
मतांचा कोटा बारकाईने लक्षात घेतला तर काँग्रेसचा दुसरा उमेदवार धोक्यात आहे. पण काँग्रेस पक्ष त्याला निवडून आणण्याची जबाबदारी घेण्यापेक्षा ती जबाबदारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टाकताना दिसत आहे.
– सेफ गेम वर शिवसेना – राष्ट्रवादीचा भर
आपले उमेदवार “सेफ” करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची मोठी मशक्कत सुरू आहे. हॉटेलमध्ये बैठकांना जोर चढला आहे. रात्रीस काय खेळ व्हायचा आहे तो होणारच आहे. मतांचा नेमका कोटा अजूनही महाविकास आघाडीने निश्चित केलेला नाही.
– भाजपचा मतांचा कोटा गुलदस्त्यात
भाजपने मतांचा कोटा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केला नव्हता. तसाच तो विधान परिषद निवडणुकीतही जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपच्या बाबतीतल्या बातम्या देखील अंदाज पंचे दाहोदर्से अशाच आहेत.
– न मागताच चाणक्य पद
राज्यसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी न मागताच मराठी माध्यमांनी बहाल केलेले चाणक्य पद आता विधान परिषद निवडणुकीत मराठी माध्यमे खरा चाणक्य कोण? देवेंद्र फडणवीस अजित पवार असे सांगून या दोघांपैकी एकाला बहाल करणार आहेत!! मराठी माध्यमांचा चाणक्य दर निवडणुकीत असाच बदलताना दिसत आहेत. एवढे करूनही विधान परिषद निवडणुकीत उद्या नेमके काय होणार? याचा महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही बाजूंनी पत्रकारांना खऱ्या अर्थाने ताकास तूर लागू दिलेला नाही!!
महत्वाच्या बातम्या
राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश : अग्निवीरमुळे तरुणाई नाराज, रस्त्यावर आंदोलन सुरू, वाढदिवस साजरा करू नका
Agnipath Scheme : सैन्याची तयारी 1989 पासून, अंमलबजावणी 2022 मध्ये; गैरसमज घालविण्यास प्राधान्य!!
सदाभाऊ खोत – राजू शेट्टी : दोन माजी मित्र भिडले; “बारामती”च्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!
राष्ट्रपतीपद की पक्षाध्यक्षपद? : काँग्रेसचा सुशीलकुमार शिंदेंवर पुन्हा राजकीय प्रयोग??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more