अजित पवार यांनी मान्य केली चूक, म्हणाले कोठून दुर्बुधी सुचली अन् वाजेला सर्व्हिसमध्ये घेतले


विशेष प्रतिनिधी

पुणे : कुठुन दुर्बुद्धी सुचली आणि त्याला सर्विसमधे घेतले. अर्थात कायदा आपले काम करतोय. पण एका व्यक्तीमुळे संपूर्ण पोलिस दल बदनाम होत आहे. तसे होणार नाही यांची सर्वांनी काळजी घ्यायला हवी, आणि चांगलं काम करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना दिला.Ajit Pawar admits mistake, says why Sachin Vaze back in service

पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालय येथे चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.अँटिलिया स्फोटके प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहेत.



या प्रकरणात महाराष्ट्रातील तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. याच सचिन वाझेबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. याआधी गाव खेड्यातही काही झाले, तर बोफोर्स झाले म्हणायचे. मात्र, आता काही झाले तरी याचा सचिन वाझे झाला असे म्हणतात.

पवार म्हणाले की, एका बहाद्दर पठ्ठ्याने असे सॉफ्टवेअर डेव्हलप केले की माझ्याच मोबाईल नंबरवरून फोन केल्याच वाटते आणि वीस लाख रुपये मागितले. पण माझ्या नंबरवरून फोन केला की कॉलर आयडीमुळे फोन नंबर येत नाही हे ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीला माहित होते. चौबे का कोणाचे नाव घेतले. आता याने केला होता की आणखी कोणी केला होता काय माहित असे सवाल उपस्थित केला आहे.

Ajit Pawar admits mistake, says why Sachin Vaze back in service

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात