‘माझ्या जीवाला धोका, जेव्हा मी सत्य उघड केले तेव्हा..’, माधवी लता यांचा आरोप!

माधवी लता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: हैदराबादमधून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माधवी लता यांच्यावर हैदराबादमधील एका बूथवर काही मुस्लिम महिला मतदारांची ओळखपत्रे तपासल्याचा आरोप आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील बुरखा काढायला सांगून त्यांची आयडीशी मिळता जुळता असल्याचे बघितले. यावरून वादाला तोंड फुटले आहे.Madhavi Lata alleges Danger to my life when I revealed the truth an FIR was registered against me



या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माधवी लताविरोधात हैदराबादमधील मलकपेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार माधवी लता म्हणाल्या की, जेव्हा मी सत्य दाखवले तेव्हा माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. महिला पोलीस हजर असताना बुरखा, निकाब, हिजाब काढून समोरासमोर तपासणी का केली जात नाही? जर काही जुळत नसेल तर याचा अर्थ मतदान फसवेगिरीने होत आहे. मी आवाज उठवल्यावर मला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणूक आयोगासमोर मी एकच नाही तर अनेक तक्रारी मांडणार आहे.

माधवी लता या मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर गाडीशिवाय जात आहेत, हा भाग ओवेसींचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं जातं. त्यांचे म्हणणे आहे की त्याचा जीव धोक्यात आहे, थोड्याच अंतरावर असे लोक आहेत जे त्यांना हानी पोहोचवू इच्छितात, परंतु त्या घाबरत नाहीत.

काँग्रेसचे राज्य सरकार आणि राज्याचे पोलीस उघडपणे ओवेसींना पाठिंबा देत आहेत. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, मला सत्य दाखवण्यापासून आणि सत्य जाणून घेण्यापासून रोखले जात आहे. असा त्यांचा आरोप आहे. तसेच, माधवी लता यांनी आरोप केला आहे की, निवडणूक प्रचारादरम्यान त्या लोकांना भेटायला जातात तेव्हा त्यांना गैरवर्तनाला सामोरे जावे लागते.

Madhavi Lata alleges Danger to my life when I revealed the truth an FIR was registered against me

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात